तीन वर्षाच्या मुलीसह महिलेने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 19:47 IST2021-05-18T19:46:10+5:302021-05-18T19:47:58+5:30

Buldhana News : पल्लवी गणेश चव्हाण (३०) आणि जान्हवी (३) अशी मृत झालेल्या दोघींची नावे आहेत.

Mother commit suicide by jumping into a well with her daughter | तीन वर्षाच्या मुलीसह महिलेने केली आत्महत्या

तीन वर्षाच्या मुलीसह महिलेने केली आत्महत्या

ठळक मुद्देबुलडाणा तालुक्यातील माळवंडी येथील घटनापोलिसांनी दोघींचेही पार्थिव विहीरीतून बाहेर काढत पंचनामा केला.


बुलडाणा तालुक्यातील माळवंडी येथील घटना
पिंपळगाव सराई: बुलडाणा तालुक्यातील माळवंडी येथे स्वतःच्या शेतातील विहिरीमध्ये उडीघेऊन मायलेकीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. नेमक्या कोणत्या कारणामुळे आपल्या तीन वर्षाच्या मुलीसह या महिलेने आत्महत्या केली ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही.

पल्लवी गणेश चव्हाण (३०) आणि जान्हवी (३) अशी मृत झालेल्या दोघींची नावे आहेत. यासंदर्भात माळवंडीचे पोलिस पाटील संजय चव्हाण यानी रायपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. घटनेचे गांभिर्य पाहता रायपूर पोलिसांनी लगोलग घटनास्थळ गाठत दोघींचेही पार्थिव विहीरीतून बाहेर काढत पंचनामा केला. सोबतच पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. ठाणेदार सुभाष दुधाळ, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक यशवंत तायडे, पोलिस कॉन्स्टेबल शांताराम जगताप, श्रीकांत चिटवार यांनी घटनास्थळ गाठून हा पंचनामा केला. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक योगेंद्र मोरे आणि त्यांचे सहकारी अमोल गवई हे करीत आहेत. नेमक्या कोणत्या कारणामुळे महिलेने आपल्या तीन वर्षाच्या चिमुकलीसह आत्महत्या केली ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही. आम्ही सध्या प्रकरणाचा तपास करत आहोत असे ठाणेदार सुभाष दुधाळ यांनी सांगितले.

Web Title: Mother commit suicide by jumping into a well with her daughter