दुचाकीचा अपघात, दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 13:55 IST2017-08-05T13:54:57+5:302017-08-05T13:55:36+5:30

motarcycle accident, two injured | दुचाकीचा अपघात, दोघे जखमी

दुचाकीचा अपघात, दोघे जखमी

दुसरबीड (बुलडाणा): मेहकर - सिंदेखड राजा मार्गावर दुसरबीड गावाजवळ
असलेल्या वळणावर भरधाव दुचाकीचालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी
रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात पडल्याने झालेल्या अपघातात दोन जण
जखमी झाले. सदर अपघात शनिवारी दुपारी १२.१५ वाजताच्या दरम्यान घडला.
अपघात झाल्याचे कळताच गावकºयांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना
रूग्णालयात दाखल करण्यात आले. एमएच २८ - एक्यू - ४९८४ क्रमांकाची
दुचाकीने मेहकरकडून सिंदखेडला दोघे जण जात असताना सदर अपघात घडला.
जखमींची ओळख अद्याप पटली नाही.

Web Title: motarcycle accident, two injured