शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

मोताळा : ट्रॅक्टरच्या धडकेत १२ गंभीर; मिरवणुकीतील घटना  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 2:26 AM

मोताळा: छत्रपती शिवाजी महाराजांच्या  जयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक स्थानिक बसस्थानक चौकात आली असता मिरवणुकीत असलेल्या ट्रॅक्टरचे ब्रेक न लागल्याने झालेल्या अपघातात धडकेमुळे मिरवणुकीतील १२ जण गंभीर जखमी झाल्याची घटना १९ फेब्रुवारी दुपारी घडली. या अपघातात १0 बालकांचा समावेश असून, सर्व जखमींवर बुलडाणा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देबसस्थानक चौकातली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा: छत्रपती शिवाजी महाराजांच्या  जयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक स्थानिक बसस्थानक चौकात आली असता मिरवणुकीत असलेल्या ट्रॅक्टरचे ब्रेक न लागल्याने झालेल्या अपघातात धडकेमुळे मिरवणुकीतील १२ जण गंभीर जखमी झाल्याची घटना १९ फेब्रुवारी दुपारी घडली. या अपघातात १0 बालकांचा समावेश असून, सर्व जखमींवर बुलडाणा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मोताळा येथील छत्रपती आखाड्याच्यावतीने हिंदवी स्वराज्याचे  संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८८ व्या  जयंतीनिमित्त सोमवारी दुपारी मिरवणूक काढण्यात आली होती.  मिरवणूक स्थानिक बसस्थानक चौकात आली असता मिरवणुकीत वापरलेल्या ट्रॅक्टरचे ब्रेक न लागल्याने झालेल्या अपघातात ट्रॅक्टरच्या धडकेत मिरवणुकीतील सहभागी १0 बालकांसह १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यात  रवींद्र चुडामन चंद्रशिव (३0), दीपक ज्योतीराम बोदडे  (४0),  नयन शिवाजी लवगे (६), रुपेश विनोद आढाव (१0),  राहुल विठ्ठल शंकपाल (१३), प्रथमेश शरद देशमुख (१५), प्रथमेश विजय शेळके (१५), अनिकेत भागवत मापारी (१३), धीरज श्रीकृष्ण वावगे (१२), अनिकेत भगवान मापारी (१३), ओम विक्रम तोमर (१३), ओम प्रकाश देशमुख (१२) यांचा समावेश आहे.  यावेळी उपस्थितांनी जखमींना त्वरित मोताळा येथील डॉ. महाजन यांच्या रुग्णालयात व तेथून  गंभीर जखमींना बुलडाणा येथे हलविण्यात आले. लद्धड हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे.  धीरज श्रीकृष्ण वावगे, अनिकेत भगवान मापारी, ओम विक्रम तोमर, ओम प्रकाश देशमुख यांच्यावरही बुलडाण्यात उपचार करण्यात येत असून, एका गंभीर जखमीला औरंगाबादला हलविले आहे.

घडले माणुसकीचे दर्शन यावेळी घटनास्थळी ट्रॅक्टरचे ब्रेक न लागल्यामुळे अनेकांनी ट्रॅक्टरसमोर उभे राहून ट्रॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी जखमी बालकांना खांद्यावर उचलत डॉ. महाजन यांच्या रुग्णालयात हलविले. यावेळी ट्रॅक्टर थांबविण्याच्या प्रयत्नात नगरसेवक नीना इंगळे यांनी ट्रॅक्टरच्या ब्रेकवर उभे राहून ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या पायाला आणि उपस्थित अन्य नागरिकांच्या हाताला गंभीर दुखापत झाली; मात्र त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे मोठी दुर्घटना टळली असून, माणुसकीचे दर्शन घडविले.

टॅग्स :Accidentअपघातbuldhanaबुलडाणा