माकडाने घेतला दोघींना चावा

By Admin | Updated: March 3, 2017 00:07 IST2017-03-03T00:07:07+5:302017-03-03T00:07:07+5:30

गोपाळ नगर भागात दोन दिवसांपासून तीन ते चार माकडांनी उच्छाद मांडला आहे. दोन महिलांना चावा घेतल्यामुळे नागरीक भयभित झाले आहेत

Monkey bites both of them bite | माकडाने घेतला दोघींना चावा

माकडाने घेतला दोघींना चावा

खामगाव, दि.३ - शहरालगत असलेल्या गोपाळ नगर भागात मागील दोन दिवसांपासून तीन ते चार माकडांनी उच्छाद मांडला आहे. या माकडांनी या परिसरातील दोन महिलांना चावा घेतल्यामुळे परिसरातील नागरीक भयभित झाले आहेत. या जखमी महिलांना अकोला येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या माकडांचा शोध घेतला असता त्यांना ते दिसून आले नाही. बुधवारी गोपाळ नगर भागातील सौ.रेखा नंदु बगाडे या महिलेला पाठीला चावा घेतला. तर दुसरे दिवशी गुरूवारी सुध्दा याच भागातील सौ.लिलाबाई श्रीराम सोळंके (वय ६०) या महिलेच्या हाताला माकडाने चावा घेतला. या दोन्ही महिलांना अकोला येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Web Title: Monkey bites both of them bite