दुचाकीच्या अपघातात चिमुकली ठार

By Admin | Updated: May 18, 2015 01:43 IST2015-05-18T01:43:20+5:302015-05-18T01:43:20+5:30

मेहकर रोडवर अपघात

Moments in a bike accident | दुचाकीच्या अपघातात चिमुकली ठार

दुचाकीच्या अपघातात चिमुकली ठार

लोणार (जि. बुलडाणा): शहरापासून एक किमी अंतरावर मेहकर रोडवर असलेल्या गजानन महाराजांच्या मंदिरासमोर दुचाकीस्वाराचा तोल गेल्यामुळे झालेल्या अपघातात दोन महिन्याची चिमुकली ठार झाल्याची घटना १७ मे रोजी घडली. मराठवाड्यातील गोरेगाव ता. सेनगाव, जि. हिंगोली येथील लखन भोसले हे टीव्हीएस सुझुकी क्र.एम.एच.२३ जे ९८५0 ने पत्नी व २ महिन्याची चिमुकली गायत्री यांच्यासह लोणारवरून शारा येथे आपल्या बहिणीकडे जात होते. दरम्यान, मेहकर रोडवरील गजानन महाराज मंदिरासमोरील वळण रस्त्यावर भोसले यांचा तोल गेला आणि दुचाकीला अपघात झाला. या अपघातात दोन महिन्याची चिमुकली गायत्री ही जागीच ठार झाली.

Web Title: Moments in a bike accident