मोताळा येथे विवाहितेचा विनयभंग

By Admin | Updated: April 6, 2017 13:29 IST2017-04-06T13:29:42+5:302017-04-06T13:29:42+5:30

घरासमोरील खाटेवर झोपलेल्या महिलेचा वाईट उद्येशाने हात धरूनओढल्याची घटना ६ एप्रिल रोजी शिरवा येथे घडली.

Molestation of marriage in Motala | मोताळा येथे विवाहितेचा विनयभंग

मोताळा येथे विवाहितेचा विनयभंग

मोताळा : घरासमोरील खाटेवर झोपलेल्या महिलेचा वाईट उद्येशाने हात धरून
ओढल्याची घटना ६ एप्रिल रोजी शिरवा येथे घडली. या प्रकरणी बोराखेडी
पोलिसांनी शिरवा येथील दिनकर धोंडू माहोरे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल
केला आहे.
        पोलिस सूत्रांनुसार पीडितेने फिर्यादीमध्ये नमूद केले आहे की, ६
एप्रिल रोजी स्वत:च्या घरासमोर खाटेवर झोपली असता, गावातील दिनकर धोंडू
माहोर वय ६५ हा तेथे आला व झोपलेल्या महिलेचा वाईट उद्येशाने हात धरून
घरात ओढत नेल्याचा प्रयत्न केला. मात्र पिडितेने आरडाओरड करून आरोपीच्या
तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली. या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी
आरोपी दिनकर धोंडू माहोरे यांच्याविरूद्ध कलम ३५४, ४५२ भादंविनुसार
गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकां राजेश वानखेडे करीत आहे.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Molestation of marriage in Motala