वाडी ब्रह्मपुरीच्या मोहिनीने महाराष्ट्राला मिळवून दिले सुवर्णपदक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:34 IST2021-03-16T04:34:35+5:302021-03-16T04:34:35+5:30

राष्ट्रीय स्तरावरील नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करताना तिने सुवर्णपदक मिळवून दिले आहे. मोहिनी नेमबाजीत तरबेज असून या प्रकारातील अनेक ...

Mohini of Wadi Brahmapuri gives gold medal to Maharashtra! | वाडी ब्रह्मपुरीच्या मोहिनीने महाराष्ट्राला मिळवून दिले सुवर्णपदक !

वाडी ब्रह्मपुरीच्या मोहिनीने महाराष्ट्राला मिळवून दिले सुवर्णपदक !

राष्ट्रीय स्तरावरील नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करताना तिने सुवर्णपदक मिळवून दिले आहे. मोहिनी नेमबाजीत तरबेज असून या प्रकारातील अनेक स्पर्धा तिने गाजविल्या आहेत. ग्रामीण भागातून असताना अत्यंत विपरीत परिस्थितीत तिने तालुका, जिल्हा, राज्य स्तरावरील स्पर्धेत यश मिळवून उत्तराखंडमधील देहरादून येथे पार पडलेल्या ४१ या नॅशनल आर्चरी चॅम्पीयनशिप स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व केले. महाराष्ट्राच्या महिला संघात नेमबाजीमध्ये प्रतिनिधित्व करताना मोहिनीने आपले कौशल्य प्रभावीपणे सादर करून सर्वोत्तम कामगिरीने महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. तिने मिळविलेल्या या यशामुळे वाडी ब्रह्मपुरी गावासह सबंध जिल्ह्याचा नावलौकिक वाढला आहे. ग्रामीण भागातून असतानादेखील राष्ट्रीयस्तरावर सुवर्णपदक मिळवून राज्यासह गाव व जिल्ह्याचा नावलौकिक वाढविल्याने मोहिनीच्या यशाचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.

Web Title: Mohini of Wadi Brahmapuri gives gold medal to Maharashtra!