२२ डब्यांत मोहगूळ सडवा, हातभट्टी केली उद्ध्वस्त
By अनिल गवई | Updated: March 23, 2024 15:18 IST2024-03-23T15:17:57+5:302024-03-23T15:18:46+5:30
२२ मार्च रोजी रात्री हिवरखेड पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविला आहे.

२२ डब्यांत मोहगूळ सडवा, हातभट्टी केली उद्ध्वस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : तालुक्यातील उमरा अटाळी परिसरातील गोंधई शिवारातील शेतात हिवरखेड पोलिसांनी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून एकास पकडले. त्याच्या ताब्यातून ११ हजार ४५० रुपयांची हातभट्टी दारू व मुद्देमाल जप्त केला. त्याच्याविरुद्ध २२ मार्च रोजी रात्री हिवरखेड पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविला आहे.
प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील उमरा अटाळी शिवारातील गोंधई शिवारातील शेतात हिवरखेड पोलिसांनी अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी लक्ष्मण गजानन चव्हाण (३२, रा. उमरा अटाळी) याला हातभट्टी दारू गाळताना रंगेहात पकडले. त्याच्या ताब्यातून २२ डब्यांमध्ये मोहगूळ सडवा मिश्रित रसायन (एकूण ३३० लिटर), प्लास्टिक कॅनमध्ये १५ लिटर हातभट्टी दारू, २५० लिटरची पाण्याची टाकी, दोन जर्मलच्या गुंड्या, दोन प्लास्टिक नळ्या, एका पोत्यात २० किलो मोहफुले, असा एकूण ११ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ६५ क, ड, फ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हिवरखेड पोलिस करीत आहेत.