मोदींचा वाढदिवस बेरोजगारी दिवस म्हणून साजरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:35 IST2021-09-19T04:35:47+5:302021-09-19T04:35:47+5:30

चिखली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भाजपद्वारे समर्पण दिवस पाळला जात असताना, चिखली विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय ...

Modi's birthday celebrated as Unemployment Day! | मोदींचा वाढदिवस बेरोजगारी दिवस म्हणून साजरा!

मोदींचा वाढदिवस बेरोजगारी दिवस म्हणून साजरा!

चिखली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भाजपद्वारे समर्पण दिवस पाळला जात असताना, चिखली विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय बेरोजगारी दिवस पाळत पकोडा स्टॉल लावून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनात युवक काँग्रेसच्या वतीने १७ सप्टेंबर रोजी बेरोजगारी दिवस साजरा करून निदर्शने करण्यात आली. त्या अनुषंगाने तहसील कार्यालयासमोर पकोडा स्टॉल लावून भजे तळून नागरिकांना मोफत वाटप करण्यात आले. यावेळी चिखली विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष बाळू साळोख, पप्पू जागृत, अतहरोद्दीन काझी, सचिन बोंद्रे, किशोर सोळंकी, अर्जुन गवई, प्रवीण पाटील, प्रकाश राठोड, संजय गिरी, संजय सोळंकी, ज्ञानेश्वर इंगळे, आकाश साळवे, इम्रान खान, लक्ष्मण भिसे, कैलास जंगले, गौतम वानखेडे, संदीप चिंचोले, स्वप्निल सोळंकी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Modi's birthday celebrated as Unemployment Day!