जमावाकडून चौघांना मारहाण
By Admin | Updated: June 7, 2017 01:00 IST2017-06-07T01:00:57+5:302017-06-07T01:00:57+5:30
लहान भावाने मुलीस पळवून नेल्याने वाद

जमावाकडून चौघांना मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : लहान भावाने मुलीस पळवून नेल्याच्या कारणावरुन पळवून नेणाऱ्याचे मोठ्या भावाने डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केले, तसेच त्याचे आई-वडील व मामाला मारहाण केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी रोहणा येथे घडली होती. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रोहणा येथील बिगू जबेदार भोसले (वय ६५) यांनी पो.स्टे.ला फिर्याद दिली की, त्यांच्या मुलाने अंत्रज येथील एका मुलीस पळवून नेले होते. यामुळे मुलीच्या घरच्यांसोबत निर्माण झालेला वाद मिटविण्यासाठी सोमवारी रोहणा येथे बैठक बोलविली होती; मात्र यावेळी पुन्हा वाद होऊन रंजू ऊर्फ रंज्या भोसले याने मुलगा जसवाल बिगू भोसले याच्या डोक्यावर कुऱ्हाड मारून जखमी केले, तसेच गजानन भोसले, पिंटोल भोसले, सचिन भोसले यांच्यासह १३ जणांनी त्यांच्यासह पत्नी व पत्नीचे भावाला मारहाण केली. या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसांनी १३ जणांविरुद्ध कलम १४७, १४८, १४९, ३०७, ३२४, ३२३, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. जसवाल भोसले याच्यावर प्रथमोपचार करून अकोला येथे हलविण्यात आले.