अल्पवयीन विद्यार्थिनीला फूस लावून पळविले
By Admin | Updated: January 30, 2016 02:25 IST2016-01-30T02:25:13+5:302016-01-30T02:25:13+5:30
पाच जणांवर गुन्हा दाखल

अल्पवयीन विद्यार्थिनीला फूस लावून पळविले
अमडापूर (जि. बुलडाणा) : नजिकच्या वडरवाड्यात राहणार्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला फूस लावून पळवून नेल्याची घटना २८ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी मुलींच्या आईने अमडापूर पोलिसात दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मुलींच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, मुलीचे आईवडील दोघेही २५ जानेवारी रोजी मजुरीसाठी बाहेरगावी गेले होते. त्यांना २८ जानेवारी रोजी शाळेतून फोन आला की, अल्पवयीन मुलगी शाळेत आली नाही. त्यानंतर आईवडील घरी आल्यानंतर त्यांच्या मुलीला गावातील अर्जुन गुलाब देवकर याने संजय धोंडू जाधव यांच्या मोटारसायकलवरुन पळून नेल्याची माहिती मिळाली. यानंतर आईने अमडापूर पोलिसात तक्रार दिली. या आधारे पोलिसांनी अर्जुन गुलाब देवकर याच्यासह संजय धोंडू जाधव, अरुण संतोष गायकवाड, लक्ष्मण हिरामण देवकर, किरण नामदेव कुसकर सर्व रा.अमडापूर यांच्यावर भादंविच्या ३५३, ३६६, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.