अल्पवयीन प्रेमी युगुलाची रेल्वेखाली आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 12:58 IST2020-03-14T12:58:00+5:302020-03-14T12:58:23+5:30

 रेल्वे लाईनवरील चारमोरी जवळ अल्पवयीन प्रेमीयुगुलाचा रेल्वेखाली कुटून मृत्यु झाला.

Minor lovers couples suicide under train | अल्पवयीन प्रेमी युगुलाची रेल्वेखाली आत्महत्या 

अल्पवयीन प्रेमी युगुलाची रेल्वेखाली आत्महत्या 

शेगाव  : अल्पवयीन प्रेमीयुगलाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. 
शुक्रवारी रात्री 11 वाजेनंतर  रेल्वे लाईनवरील चारमोरी जवळ अल्पवयीन प्रेमीयुगुलाचा रेल्वेखाली कुटून मृत्यु झाला.  अल्पवयीन प्रेमी युगुल संध्याकाळ पासून घरून गायब होते. नातेवाईकांनी शोधाशोध केली. तद्नंतर शनिवारी पहाटे 5 वाजेदरम्यान मृतदेहाजवळील मोबाईल वरून मृतक दोघांची ओळख पटली. तात्काळ पोलिसांनी मोबाईल मधील नंबरवरून नातेवाईकांनी संपर्क साधला. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यु ची नोंद केली आहे.  पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोडे यांचे मार्गदर्शनाखाली बीट जमदार बाळासाहेब खिराडे, ज्योती खिराडे,पोकाॅ अशांत सोरते करीत आहेत.  (शहर प्रतिनिधी)

Web Title: Minor lovers couples suicide under train