चिखली तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 11:29 IST2020-03-10T11:29:38+5:302020-03-10T11:29:41+5:30

7 मार्च रोजी अल्पवयीन मुलगी तिच्या आईसोबत शेतात कामासाठी गेली होती

Minor girl tortured in Chikhali taluka buldhana | चिखली तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

चिखली तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अमडापूर: चिखली तालुक्यातील कावळा परीसरात आठ वर्षे मुलीवर 45 वर्षीय व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना दहा मार्च रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी अमडापूर पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. 7 मार्च रोजी अल्पवयीन मुलगी तिच्या आईसोबत शेतात कामासाठी गेली होती. त्यावेळी शेतातील पाईप उचलून आणल्यास पाईप असे आमिष दाखवून आरोपी गजानन मोरे याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. दरम्यान पीडित मुलीस त्रास  होऊ लागल्याने तिने हा प्रकार आईस कथन केला. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली अमडापूर पोलिसांनी दहा मार्च रोजी पहाटे दोनच्या सुमारास प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.

Web Title: Minor girl tortured in Chikhali taluka buldhana