अल्पवयीन मुलीस पळवणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:37 IST2021-09-25T04:37:09+5:302021-09-25T04:37:09+5:30

काेविडमुळे १४ मुले झाले अनाथ बुलडाणा : कोविडमुळे अनाथ झालेली बालके १४ असून त्यामध्ये दहा मुली व चार मुलांचा ...

Minor girl kidnapper arrested | अल्पवयीन मुलीस पळवणाऱ्यास अटक

अल्पवयीन मुलीस पळवणाऱ्यास अटक

काेविडमुळे १४ मुले झाले अनाथ

बुलडाणा : कोविडमुळे अनाथ झालेली बालके १४ असून त्यामध्ये दहा मुली व चार मुलांचा समावेश आहे. तसेच एक पालक झालेल्या बालकांची संख्या ३७६ असून त्यामध्ये मुले २०५ व १७१ मुलींचा समावेश आहे.

विजेच्या लपंडावाने ग्रामस्थ त्रस्त

मासरूळ : परिसरात गत काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. याकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी हाेत आहे.

काेलवड येथे गांडूळ खताविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

बुलडाणा : काेलवड येथे कृषिदूतांच्या वतीने शेतकऱ्यांना गांडूळ खताविषयी मार्गदर्शन करण्यात आले. वराेरा येथील कृषिदूत पृथक डवले, हर्षल राठाेड, अविनाश दंदाले व सूरज सांगळे आदींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

ई-पीक नाेंदणीसाठी शेतकऱ्यांची फरपट

धाड : शासनाने यावर्षीपासून ई-पीक नाेंदणी सुरू केली आहे. ही नाेंदणी करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. इंटरनेटचा खाेडा येत असल्याने अनेक शेतकरी नाेंदणीपासून वंचित आहेत. त्यामुळे शासनाने ई-पीक नाेंदणी तलाठ्यामार्फतच करण्याची मागणी हाेत आहे.

Web Title: Minor girl kidnapper arrested