Milk Supply : रस्त्यावर दूध ओतून शासनाचा केला निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 13:34 IST2018-07-16T13:32:44+5:302018-07-16T13:34:12+5:30
संग्रामपूर तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं वरवट बकाल येथील बस थांबा रस्त्यावर दूध ओतून सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला.

Milk Supply : रस्त्यावर दूध ओतून शासनाचा केला निषेध
संग्रामपूर : संग्रामपूर तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं वरवट बकाल येथील बस थांबा रस्त्यावर दूध ओतून सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला. गेल्या काही वर्षांपासून शेतीला जोड धंदा म्हणून दूध उत्पादनावर आधारित पशू पालन म्हणजेच दूध व्यवसाय सर्व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात करतात. परंतु गेल्या काही महिन्यांपासून दुधाचे दर हे राज्य सरकारने पाण्यापेक्षाही कमी केल्यामुळे सरकारला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने प्रति लिटर ५ रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे तसेच अनेक शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत त्या शेतकऱ्यांचे पैसे तात्काळ बँक खात्यात जमा करण्यात यावे या प्रमुख मागण्या घेऊन या आंदोलनामधे सर्व शेतकरी सहभागी होऊन सरकारविरोधात निषेध व्यक्त करत आहेत.