शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्रीपासून खामगाव अंधारात

By admin | Updated: June 2, 2017 00:12 IST

तब्बल १० तास खंडित होता वीज पुरवठा; नागरिक हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहरातील कॉटन मार्केट फिडर अंतर्गत झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे बुधवारी रात्री २ वाजतापासून निम्म्या शहराचा वीज पुरवठा खंडित झाला. तब्बल १० तासांपर्यंत हा वीज पुरवठा सुरळीत होऊ न शकल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. कॉटन मार्केट फिडर अंतर्गत उच्च दाब विद्युत वाहिनीची अंडरग्राऊंड केबल जळाल्याने या फिडरवरून होणारा वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे बाळापूर फ ैल, सती फ ैल, रेखा प्लॉट, शिवाजी नगर, जुना फैल, मस्तान चौक, बर्डे प्लॉट, दाळ फैल, फाटकपुरा, रायगड कॉलनी यासह निम्म्याहून अधिक शहरात रात्री २ वाजतापासून अंधार पसरला. सकाळपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. त्यामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागल्याने त्यांच्या झोपेचे खोबरे झाले. दरम्यान, सकाळी ओंकारेश्वर व सजनपुरी फिडरवरून तात्पुरता वीज पुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली. १० वाजेपर्यंत जवळपास ८० टक्के भागातील वीज पुरवठा सुरळीत झाला होता, तर दुरुस्तीचे काम दुपारी ४ वाजताच्या सुमारास पूर्ण झाले. याकरिता सहायक अभियंता अजय गावंडे यांच्या मार्गदर्शनात वीज कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.संतप्त नागरिकांची तोडफोडरात्री २ वाजता वीज पुरवठा खंडित झाल्यापासून गौतम चौकातील वीज वितरणच्या कार्यालयावर नागरिकांच्या अनेक झुंडी सकाळपर्यंत येत होत्या. यावेळी तक्रार निवारण केंद्राचा दूरध्वनी बंद असल्याची तक्रार अनेक नागरिकांनी केली, तर संतप्त जमावाने कार्यालयाचे लोखंडी व लाकडी गेट कुलपासह तोडले असल्याची माहिती सहायक अभियंता गावंडे यांनी दिली असून, यासंदर्भात शहर पोलीस स्टेशनला तक्रार देणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.रमजानमध्ये मुस्लीम बांधवांना त्रासकॉटन मार्केट फिडर अंतर्गत मस्तान चौक, जुना फैल, बर्डे प्लॉट, फाटकपुरा आदी मुस्लीमबहुल वस्तीचा समावेश असल्याने रमजानच्या दिवसांत समाजबांधवांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे मुस्लीम बांधवांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.विद्युत पुरवठ्याच्या बाबतीत तांत्रिक बिघाड हे सांगून होत नाहीत. बिघाड झाल्यानंतर तो शक्य तेवढ्या लवकर दुरुस्त करण्याचा प्रयत्न महावितरणकडून करण्यात येतो. कर्मचारी ऊन पावसाचा विचार न करता आपले कर्तव्य पार पाडत असतात. अशावेळी नागरिकांनी संयम ठेवून सहकार्य करणे अपेक्षित आहे.-अजय गावंडे, सहायक अभियंता.