मध्यान्ह भोजनात पहिल्या दिवशी मिळणार गोडधोड
By Admin | Updated: June 24, 2015 02:00 IST2015-06-24T02:00:26+5:302015-06-24T02:00:26+5:30
प्रवेशोत्सव तयारी ; नवागतांचे होणार स्वागत.

मध्यान्ह भोजनात पहिल्या दिवशी मिळणार गोडधोड
सिद्धार्थ आराख / खामगाव : येत्या २६ जूनला विदर्भातील सर्व शाळा सुरू होत असून, शाळांमध्ये प्रवेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शाळांचा परिसर विद्यार्थ्यांनी फुलून जाणार आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या मध्यान्ह भोजनात शाळेच्या पहिल्या दिवसाच्या मेन्यूमध्ये गोड पदार्थ देण्यात येणार आहेत. नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत करण्यासाठी नवागतांसह शिक्षकही सज्ज झाले आहेत. उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीनंतर २६ जून शुक्रवारपासून विदर्भातील शालेय सत्राला प्रारंभ होत आहे. यात सर्व शाळांनी तसेच विद्यालयांनी नवागतांचे स्वागत वाजत-गाजत करावे आणि प्रत्येक शाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रम राबवावा, असे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. मागील दोन वर्षांंपासून राज्यभरातील काही शाळा अशा प्रकरचा कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करतात. काही शाळा तर चक्क ढोलताशांच्या गजरात मुलांचे स्वागत करतात. यावर्षीसुद्धा मुलांच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आदेश दिल्यामुळे बहुतांश शाळांमध्ये साफसफाईची कामे सुरू झाली आहेत. अनेक शाळांमध्ये उत्साही शिक्षक शाळेची सजावट करून शालेय परिसर प्रसन्न करतात. नव्या कामाचा शुभारंभ करताना गोडधोड वाटपाची परंपरा आहे. ही परंपरा शाळेतसुद्धा अंगीकारण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या मध्यान्ह भोजनातील जेवणात गोड पदार्थाचा समावेश करण्यात येणार आहे; मात्र मेन्यूतील हा बदल किती शाळांत दिसेल, हासुद्धा प्रश्न आहे. जिल्हा परिषदेच्या १२00 आणि खासगी शाळांना स्वागतोत्सव कार्यक्रम साजरा करीत विद्यार्थ्यांंची १00 टक्के पटनोंदणी करण्याच्या सूचना सर्व मुख्याध्यापकांना देण्यात आले आहे. स्वागतोत्सवासाठी त्यातील पदाधिकारी व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्यांचे सहकार्य घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न करणार आहेत.