शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
5
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
8
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
9
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
10
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
11
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
12
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
13
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
14
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
15
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

पुरात वाहुन गेल्याने मेहकर बाजार समिती संचालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2021 11:07 AM

Mehkar News : पुंजाजी नारायण कान्हे (४८) यांचा रविवारी रात्री मृत्यू झाला़.

लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर / मेहकर : नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याने मेहकर बाजार समितीचे संचालक पुंजाजी नारायण कान्हे (४८) यांचा रविवारी रात्री मृत्यू झाला़. अमडापूर पाेलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या डाेंगरगावजवळ ही घटना घडली़.  मेहकर बाजार समितीचे संचालक पुंजाजी कान्हे हे तालुक्यातील सारशिव येथे वास्तव्यास आहेत. रविवारी त्यांच्या मुलीची प्रसूती झाली हाेती़ त्यांना भेटण्यासाठी ते दुचाकीने बुलडाणा गेले होते. परत मंगरूळ नवघरे मार्गे येताना त्यांनी घरी कोणी नसल्याने सावरखेडवरून सारशिव न येता सासुरवाडीला डोंगरगावकडे वळले. सावरखेड जवळ डोंगरगाव रस्त्यावर छोट्या नाल्याला रात्री अंदाजे साडेआठच्या दरम्यान परिसरात पाऊस झाल्याने पूर आला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांनी नाल्याच्या पाण्यात मोटरसायकल टाकली व ते वाहून जात समोर बोगद्यात अडकले. मात्र या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ही बाब उघडकीस आली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी अमडापूर पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूंची नाेंद केली आहे़

टॅग्स :Mehkarमेहकरbuldhanaबुलडाणा