पुरात वाहुन गेल्याने मेहकर बाजार समिती संचालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 11:07 IST2021-06-08T11:07:21+5:302021-06-08T11:07:43+5:30

Mehkar News : पुंजाजी नारायण कान्हे (४८) यांचा रविवारी रात्री मृत्यू झाला़.

Mehkar Bazar Samiti director dies due to floods | पुरात वाहुन गेल्याने मेहकर बाजार समिती संचालकाचा मृत्यू

पुरात वाहुन गेल्याने मेहकर बाजार समिती संचालकाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
अमडापूर / मेहकर : नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याने मेहकर बाजार समितीचे संचालक पुंजाजी नारायण कान्हे (४८) यांचा रविवारी रात्री मृत्यू झाला़. अमडापूर पाेलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या डाेंगरगावजवळ ही घटना घडली़. 
 मेहकर बाजार समितीचे संचालक पुंजाजी कान्हे हे तालुक्यातील सारशिव येथे वास्तव्यास आहेत. रविवारी त्यांच्या मुलीची प्रसूती झाली हाेती़ त्यांना भेटण्यासाठी ते दुचाकीने बुलडाणा गेले होते. परत मंगरूळ नवघरे मार्गे येताना त्यांनी घरी कोणी नसल्याने सावरखेडवरून सारशिव न येता सासुरवाडीला डोंगरगावकडे वळले. सावरखेड जवळ डोंगरगाव रस्त्यावर छोट्या नाल्याला रात्री अंदाजे साडेआठच्या दरम्यान परिसरात पाऊस झाल्याने पूर आला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांनी नाल्याच्या पाण्यात मोटरसायकल टाकली व ते वाहून जात समोर बोगद्यात अडकले. मात्र या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ही बाब उघडकीस आली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी अमडापूर पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूंची नाेंद केली आहे़

Web Title: Mehkar Bazar Samiti director dies due to floods