शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर येथे वीज, पिण्याच्या पाण्यासाठी टाकीवर चढून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 12:22 IST

At Mehkar, agitation by climbing on the water tank : १३० फूट उंचीच्या पाण्याच्या टाकीवरच चढून शोले स्टाईलने आंदोलन केले.

मेहकर : स्थानिक  नगरपरिषदेने दिलेल्या घरकुलामध्ये कोणत्याच प्रकारची सुविधा नसल्याने एका लाभार्थ्याने घरकुलाच्या परिसरातील अपूर्ण बांधकाम असलेल्या १३० फूट उंचीच्या पाण्याच्या टाकीवरच चढून शोले स्टाईलने आंदोलन केले. विद्युत आणि पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे सात तास हे आंदोलन सुरू होते.  मुख्याधिकाऱ्यांनी लेखी पत्र देऊन  गुरुवारी चर्चेसाठी बोलाविल्याने आंदोलनकर्त्याने सात तासांनंतर आपले आंदोलन मागे घेतले. दरम्यान, पोलिसांनी आंदोलनकर्त्याला अटक करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मेहकर नगरपरिषदेच्यावतीने जानेफळ रस्त्यावरील गरजू लोकांसाठी घरकुल बांधून काही वाटप करण्यात आलेले आहे. मात्र या घरकुलात लाभार्थ्यांना पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसह वीज पुरवठा होत नसल्याने लाभार्थ्यांना अंधारात राहावे लागत आहे.गेल्या चार-पाच वर्षांपासून घरकुल क्रमांक ९५ मध्ये राहणाऱ्या अशपाक शहा  यांनी एक ते दोन महिन्यांपूर्वी नगरपालिकेत मुख्याधिकारी यांच्या नावाने रहात असलेल्या घरकुलात सुविधा देण्याची मागणी केली होती. नगरपरिषद घरकुल लाभार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा, वीज कनेक्शन पुरवीत नसल्याने या घरकुलात राहणाऱ्या अशपाक शाह यांनी बुधवारी सकाळी नऊ वाजता घरकुलाच्या परिसरात घरकुलांच्या लाभार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या १३० फूट उंची असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन सुरू केले होते. दरम्यान, पोलीस, नगर परिषद व महावितरणचे कर्मचारी उपस्थित झाले. हे आंदोलन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने शेवटी पोलिसांना राखीव पोलीस दलाची तुकडी व नगरपरिषद यांना अग्निशामक दल पाचारण  करावे लागले. यावेळी  अशपाक शहा यांच्या समर्थनासाठी   इतर लाभर्थी या ठिकाणी हजर होते.

टॅग्स :Mehkarमेहकरbuldhanaबुलडाणाagitationआंदोलन