शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

उन्नती पर्वातंर्गत शनिवारी मेहकरात फासेपारधींचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 17:58 IST

बुलडाणा जिल्ह्यातील फासेपारधी समाजाच्या विकासासाठी पोलिस प्रशासनाने पुढाकर घेऊन सुरू केलेल्या ‘उन्नती पर्व’ उपक्रमातंर्गत फासेपारधी समाजाचा दुसरा मेळावा आता मेहकर पोलिस पोलिस स्टेशन परिसरात १६ फेब्रुवारी रोजी सकाळी आयोजित करण्यात आला आहे.

बुलडाणा: भटकंतीला पसंती देणाऱ्या व विकासाच्या मुख्य प्रवाहापासून अद्यापही दूर असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील फासेपारधी समाजाच्या विकासासाठी पोलिस प्रशासनाने पुढाकर घेऊन सुरू केलेल्या ‘उन्नती पर्व’ उपक्रमातंर्गत फासेपारधी समाजाचा दुसरा मेळावा आता मेहकरपोलिस पोलिस स्टेशन परिसरात १६ फेब्रुवारी रोजी सकाळी आयोजित करण्यात आला आहे.दोन फेब्रुवारी रोजी या उपक्रमास प्रारंभ झाला असून त्यातंर्गतचा हा मेळावा घाटावरील भागात घेण्यात येत असून घाटावरील ५४ गावातील ८६८ कुटुंबातील फासेफारधी समाजबांधव या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. फासेपारधी समाजातील युवकांसाठी पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण, स्वयंरोजगार प्रशिक्षण, वाहन, चालक प्रशिक्षण, मोफत घरकुूल वाटप, अतिक्रमित घरांच्या जागा नियमित करणे, जातीचे दाखले, जात वैधता प्रमाणपत्र, रेशनकार्ड यासह विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याच्या दृ्ष्टीने या प्रकल्पातंर्गत १२ प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासनातर्फे करण्यात येत असून या उपक्रमाचा दुसरा टप्पा आता सुरू होत आहे.मेहकर पोलिस ठाण्याच्या परिसरात अमरावतीचे पोलिस उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे, जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे,  प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक भागवताचार्य गजाननदादा शास्त्री महाराज, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ,  प्रकल्पाचे समन्वयक मुक्तेश्वर कुळकर्णी, मुकूंद जोशी हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात घाटावरील ५४ गावात आढळणार्या फासेपारधी समाजातील जवळपास दोन हजार नागरिक उपस्थित राहणार आहेत. त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ठ करण्याच्या दृष्टीकोणातून एक कृती आराखडा मेळाव्याच्या माध्यमातून तयार करण्यात येणार आहे. यापूर्वी तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्ण प्रकाश यांच्या कार्यकाळातही अशाच प्रकारचा पूनर्वसन प्रकल्प राबविण्यात आला होता. दरम्यान, या  मेळाव्यात तथा उपक्रमात विविध शासकीय योजना राबविणारे अधिकारी, कर्मचारी यांनीही सहकार्य करून हा उपक्रम यशस्वी करण्यास हातभार लावावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkarमेहकरPoliceपोलिस