खामगावातील प्लास्टीक गोदामाला भीषण आग, लक्षावधी रूपयांची हानी
By अनिल गवई | Updated: June 10, 2023 19:33 IST2023-06-10T19:33:01+5:302023-06-10T19:33:21+5:30
शहरातील एका प्लास्टीकच्या गोदामाला शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली.

खामगावातील प्लास्टीक गोदामाला भीषण आग, लक्षावधी रूपयांची हानी
खामगाव (बुलढाणा) : शहरातील एका प्लास्टीकच्या गोदामाला शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत गोदामातील प्लास्टीक, ऑईल पेंट आणि इतर साहित्य भस्मसात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याबाबत सविस्तर असे की, खामगाव शहरातील जीन माता मंदिर परिसरात अनिल गणवाणी नामक व्यापार्याचे प्लास्टीक तसेच इतर ऑईल पेंटचे गोदाम आहे. या गोदामाला शनिवारी सायंकाळी अचानक आग लागली.
उकाड्यामुळे आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. या घटनेची माहिती मिळताच,खामगाव आणि शेगाव अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, आगीचे स्वरूप मोठे असल्याने आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाला मोठे प्रयत्न करावे लागले. आग लागलेल्या ठिकाणाजवळच लोकवस्ती असल्यामुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत, आपापल्या परिने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. तर घटनेचे गांभीर्य ओळखून शहर पोलीस निरिक्षक शांतीकुमार पाटील यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळ गाठले.