विविध संघटनांकडून मेहकरात बंद
By Admin | Updated: June 4, 2014 00:47 IST2014-06-03T23:45:47+5:302014-06-04T00:47:54+5:30
मेहकर येथे भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांना विविध संघटनांनी श्रद्धांजली वाहिली.

विविध संघटनांकडून मेहकरात बंद
मेहकर : केंद्रीय ग्राम विकास मंत्री भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांना आज सकाळी ११ वाजता शिवसेना पक्षासह विविध संघटनांनी श्रद्धांजली वाहिली. तसेच या दु:खद घटनेबद्दल महायुतीच्या आवाहनास प्रतिसाद देत व्यापार्यांनी मेहकरातील बाजारपेठ बंद ठेवून शोक व्यक्त केला. भाजपा नेते गोपीनाथ मुंढे यांच्या अपघाताचे वृत्त मेहकरात येताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. शिवसेनेच्यावतीने शिवसेना कार्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले. शोकसभेच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष रामराव म्हस्के हे होते. तर बाजार समिती सभापती अँड. सुरेश वानखेडे, माजी नगराध्यक्ष संजय जाधव, तालुका प्रमुख सुरेश वाळूकर, अर्बन बँक अध्यक्ष बबनराव भोसले, उपसभापती बबनराव तुपे यांची प्रमुख उपस्थिती होती. शोकसभेचे प्रास्ताविक व संचालन शहरप्रमुख जयचंद बाठिया यांनी केले. उपस्थित सर्वांनी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांना २ मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. शोकसभेनंतर महायुतीच्या वतीने शहरात फेरफटका मारून व्यापार्यांना बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.