मासाहेब जिजाऊ व विवेकानंद हे मानव कल्याणाचे प्रेरक : वाकुडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:30 IST2021-01-13T05:30:48+5:302021-01-13T05:30:48+5:30

ते १२ जानेवारी रोजी स्थानिक मुद्रांक व नोंदणी कार्यालयात आयोजित जिजाऊ जयंती कार्यक्रमात बोलत होते. कृषी अधिकारी अंकुश खाडे ...

Masaheb Jijau and Vivekananda are the drivers of human welfare: Wakude | मासाहेब जिजाऊ व विवेकानंद हे मानव कल्याणाचे प्रेरक : वाकुडे

मासाहेब जिजाऊ व विवेकानंद हे मानव कल्याणाचे प्रेरक : वाकुडे

ते १२ जानेवारी रोजी स्थानिक मुद्रांक व नोंदणी कार्यालयात आयोजित जिजाऊ जयंती कार्यक्रमात बोलत होते. कृषी अधिकारी अंकुश खाडे यांनी प्रास्ताविक केले. दुय्यम निबंधक वाकुडे व इतर मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर वाकुडे यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. राजमाता जिजाऊंनी स्वराज्याची प्रेरणा दिली, तर स्वामी विवेकानंदांनी या देशातल्या तरुणांना कार्यतत्पर होण्याचा संदेश दिला. त्यामुळे विशेषतः तरुणांनी या महापुरुषांचा आदर्श अंगी बाणवावा, असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी संगणक परिचालक एजाजभाई देशमुख, अर्जुन तुपे, शिसोदे, अमोल शिंदे, दीपक बाजड, सागर कानोडजे, विजय शेजूळ हे उपस्थित होते. यावेळी मुद्रांक व नोंदणी कार्यालयात कार्यालयीन कामकाजासाठी आलेल्या पक्षकारांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.

Web Title: Masaheb Jijau and Vivekananda are the drivers of human welfare: Wakude