ज्या मैदानाने घडविले त्याच मैदानात शहीद कैलास पवारांना विसावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 11:02 AM2021-08-05T11:02:02+5:302021-08-05T11:02:16+5:30

Martyr Kailas Pawar : चिखलीचे वीरपुत्र कैलास भारत पवार यांना ४ ऑगस्ट रोजी स्थानिक तालुका क्रीडा संकुलावर अखेर निरोप देण्यात आला.

Martyr Kailas Pawar rest in piece at Chikhli | ज्या मैदानाने घडविले त्याच मैदानात शहीद कैलास पवारांना विसावा!

ज्या मैदानाने घडविले त्याच मैदानात शहीद कैलास पवारांना विसावा!

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : अगदी लहानपणा पासूनच सैन्यात दाखल होवून देशसेवा करायची, हे ध्येय उराशी बाळगून कठोर परिश्रमाने सैन्यदलात दाखल झालेले चिखलीचे वीरपुत्र कैलास भारत पवार यांना ४ ऑगस्ट रोजी स्थानिक तालुका क्रीडा संकुलावर अखेर निरोप देण्यात आला. घरची परिस्थिती बेताची, त्यात किरकोळ शरीरयष्टी. यावर मात करून सैन्यदलात दाखल होण्यासाठी शहीद पवार यांनी तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानात अहोरात्र सराव केला होता. ज्या मैदानातून ते घडले, त्याच मैदनात विशाल जनसागाराच्या साक्षीने विसावले आहेत.
वडील गॅरेजवर मेकॅनिक म्हणून काम करतात. परंतू, सध्या आजारपणामुळे काम करू शकत नाहीत. आई उज्वला ह्या अंगणवाडी सेविका आहेत. लहान भाऊ अक्षय व बहीण पूजा दोघांचे शिक्षण सुरू आहे. अशी कौटूंबिक पार्श्वभूमी असलेल्या शहीद कैलास पवार यांनी सैन्य दलात दाखल होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. १२ नंतर प्रचंड जीद्द आणि मेहनतीच्या बळावर २०१६ मध्ये नांदेड येथे आर्मीत दाखल झाले होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर १०-महार रेजिमेंटमध्ये त्यांची पोस्टींग झाली होती. 
ज्या मैदानातील मातीत ते घडले त्याच मैदानातील मातीत विलीन होतांना रिमझिम बरसणारा पाऊस पाहता जणू आभाळ देखील आसवे गाळत असल्याचा भास होत होता.

कुटुंबियांकडे राष्ट्रध्वज सोपवला
यावेळी महार रेजिमेंटचे लेप्टनंट कर्नल विनोद गवई यांनी वीरमाता उज्वला पवार यांच्याकडे राष्ट्रध्वज सोपवला. त्यावेळी कुटुंबियांच्या भावना अनावर झाल्या होत्या. उपस्थितांच्या डोळ्याच्या कडाही यावेली अेालावल्या होत्या. शहीद कैलास पवार याचा राष्ट्रीय रायफल्समध्ये असलेला व काश्मीरमध्ये तैनात असलेल्या मिळाने वीर जवान तुझे सलाम असे म्हणताच उपस्थित गहीवरले होते. हे दोघे ही जिवलग मित्र होते.


५ ऑगस्टला येणार होते घरी
सुटी मिळल्याने ५ ऑगस्टला ते चिखलीत घरी येणार होते. मात्र, त्यापूर्वीत त्यांना विरगती प्राप्त झाल्याचे वृत्त येऊन धडकले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाव दु:खाचा हिमालयच कोसळला. शहीद पवार यांच्या घरी कैलास पवार यांच्या पार्थिवाचे कुटुंबियांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर सजविलेल्या वाहनात तिरंग्यात लपेटलेल्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. पुंडलिक नगर, खंडाळा रोड चौफुली बसस्थानक मार्गे तालुका क्रीडा संकुलावर अंत्ययात्रा पोहोचली व तेथेच त्यांच्या पार्थिवार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
 

Web Title: Martyr Kailas Pawar rest in piece at Chikhli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.