विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2017 03:19 IST2017-04-03T03:19:01+5:302017-04-03T03:19:01+5:30
साखरखेर्डा येथील एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १ एप्रिल रोजी रात्री घडली.

विवाहितेची आत्महत्या
साखरखेर्डा (जि. बुलडाणा), दि. २- येथील एका विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १ एप्रिल रोजी रात्री घडली. साखरखेर्डा येथील साजीया परविन मो.ईरफान (वय २६) हे दोघे पती-पत्नी साखरखेर्डा येथे राहात होते. १ एप्रिलला रात्री ८ वाजताच्या सुमारास साजीया परविन हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. तातडीने तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता. तिची प्राणज्योत मालवली होती. आज सकाळी मृतकाचे वडील मुजफ्फर हुसेन यांच्या तक्रारीवरुन आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.