विजेच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू

By Admin | Updated: December 5, 2014 00:21 IST2014-12-05T00:21:10+5:302014-12-05T00:21:10+5:30

विजेचा धक्का लागल्याने २८ वर्षीय विवाहितेचा मृत्यू, तर ४ वर्षीय चिमुकला अत्यवस्थ.

Marriage death by electric shock | विजेच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू

खामगाव (बुलडाणा) : वेगवेगळ्या दोन घटनेत विजेचा धक्का लागल्याने २८ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला, तर ४ वर्षीय चिमुकला अत्यवस्थ झाल्याने त्याला उपचारार्थ येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. शेगाव तालुक्यातील सगोडा येथील शुभांगी रवींद्र बाठे (वय २८) ही विवाहिता काल रात्री पाणी भरण्यासाठी मोटरपंप सुरू करण्यास गेली असता पीन लावत असताना तिला विजेचा धक्का लागल्याने ती बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली. तिला तातडीने येथील सईबाई मोटे सामान्य रुग्णालयात आणण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे सगोडा गावात शोककळा पसरली आहे. दुसर्‍या घटनेत खामगाव तालुक्यातील अंत्रज येथील आर्यन रवींद्र गवई (वय ४) हा चिमुकला घरात खेळत असताना घरातील इलेक्ट्रिक वस्तूला त्याचा स्पर्श झाल्याने तो अत्यवस्थ झाला. त्यामुळे त्याला उपचारासाठी येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आर्यनवर तातडीने उपचार करण्यात आल्याने सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Web Title: Marriage death by electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.