सोशल डिस्टंसिंग पाळत पार पडला विवाह सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 17:50 IST2020-04-08T17:50:13+5:302020-04-08T17:50:21+5:30
कोरोनाचे संकट पाहता सोशल डिस्टंसिंग पाळत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला.

सोशल डिस्टंसिंग पाळत पार पडला विवाह सोहळा
हिवरा आश्रम: कोरोनाचे संकट पाहता सोशल डिस्टंसिंग पाळत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला. स्वकियांनी 'व्हिडिओ कॉल'द्वारे वर-वधुला आशिर्वाद दिले. ब्रम्हपुरी येथील नरेंद्र म्हस्के यांचा मुलगा विशाल व नागझरी बु.येथील गजानन दरेकर यांची कन्या लक्ष्मी यांचा विवाह सोहळा ७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता. दोन्हीही परीवारामध्ये लग्नाची तयारी सुरु होती. मात्र कोरोना विषाणूच्या प्रकोपाने देशभरात लॉकडाऊन झाले.अशा परीस्थितीत सर्व कार्यक्रम रद्द ठेवण्यात आले. प्रशासनाच्या आदेशाचे पालन करीत वर-वधूच्या आई- वडिलांसह केवळ मोजक्या दोन ते तीन पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह पार पाडला. सोशल डिस्टसिंगचे पालन करण्यात आले. कोरोना विषाणुमुळे अर्थव्यवस्था कोलमडुन गेली आहे. अशा प्रसंगी विवाहावर खर्च करणे योग्य नाही. त्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीने विवाह करण्याचा घरात विचार केला. याला घरातील सर्वांनी दुजोरा दिला. तसेच मुलींच्या नातेवाईकांनी तयारी दर्शवली. विवाह संपन्न झाल्याचे कळल्यानंतर आप्त -स्वकियांनी व्हिडीओ कॉलद्वारे वर-वधूला आशीर्वाद दिलेत.