बस अपघातात विवाहिता ठार
By Admin | Updated: May 30, 2014 22:48 IST2014-05-30T22:20:31+5:302014-05-30T22:48:43+5:30
कवठय़ा महाकाळ येथील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या ५ जणांमध्ये चिखलीतील विवाहीत मुलीचा समावेश आहे.

बस अपघातात विवाहिता ठार
चिखली : शेगाव आगाराच्या शेगांव-सांगली या बसला ३0 मे रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास कवठय़ा महाकाळ येथे झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या ५ जणांमध्ये येथील सुहास ऊर्फ बाळ गरूजी व्यवहारे यांची मुलगी जयङ्म्री प्रसाद पर्हाडकर यांचा समावेश आहे. सुदैवाने या अपघातात मृतक जयङ्म्री यांची मुलगी बचावली आहे. शेगाव आगाराची शेगांव-सांगली बस क्र.एम.एच.१४ बी.टी.३६१३ ही बस चिखली येथून २९ मे रोजी सांयकाळी ५ वाजता रवाना झाली. जयङ्म्री पर्हाडकर आपल्या चिमुकलीसह कोल्हापूरला सासरी जाण्यासाठी प्रवास करीत होत्या. दरम्यान पहाटे ५ वाजेच्या सुमारास कवठय़ा महाकाळ येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रेतीच्या ट्रकला बसने जबर धडक दिली. या अपघातात १0 प्रवाशी जखमी झाले असून पाच जण ठार झाले आहेत. यातील मृतकांमध्ये जयङ्म्री पर्हाडकर यांचा समावेश आहे. तर त्यांच्यासोबत असलेल्या लहान मुलीला किरकोळ इजा पोहचली असून ती बचावली आहे.