विवाहितेचा विनयभंग, चौघांविरूद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 16:43 IST2020-10-23T16:43:44+5:302020-10-23T16:43:51+5:30
Khamgaon Crime News संतोष पुरोहित विरूद्ध विनयभंगासह अँट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

विवाहितेचा विनयभंग, चौघांविरूद्ध गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : विवाहितेचा विनयभंग करण्यासोबतच जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी परस्पर तक्रारीवरून दोन्ही गटातील चौघांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही करवाई बुधवारी करण्यात आली. महाकाल चौकातील विवाहितेने शिवाजीनगर ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार शिवाजी वेशीतील रहिवासी संतोष पुरोहित (वय ३२) याने बुधवारी सायंकाळी विवाहितेच्या घराचा दरवाजा ठोठावला. तसेच वाईट उद्देशाने हात धरून विनयभंग केला. सोबतच जातीवाचक शिवागाळही केली. त्यावरून संतोष पुरोहित विरूद्ध विनयभंगासह अँट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.