Maratha Reservation Protest: खामगावात आमदार फुंडकरांच्या बंगल्यासमोर निर्दशने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 15:33 IST2018-08-03T15:31:16+5:302018-08-03T15:33:05+5:30
खामगाव: बुलडाणा जिल्हा समन्वय समितीच्या निर्देशानुसार शुक्रवारी दुपारी २:३० वाजता खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅड. आकाश फुंडकर यांच्या घरासमोर निदर्शने करण्यात आली.

Maratha Reservation Protest: खामगावात आमदार फुंडकरांच्या बंगल्यासमोर निर्दशने
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: बुलडाणा जिल्हा समन्वय समितीच्या निर्देशानुसार शुक्रवारी दुपारी २:३० वाजता खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅड. आकाश फुंडकर यांच्या घरासमोर निदर्शने करण्यात आली.
यावेळी मराठा आरक्षण समाजाला त्वरित मिळण्याची मागणी करण्यात आली. तसेच ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘आमदार साहेब चुप्पी खोलो, विधानसभा में कुछ तो बोलो’, अशा घोषणादेत निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींचे निवेदन आमदारांचे प्रतिनिधी म्हणून भाजप शहराध्यक्ष तथा सकल मराठा समाजाचे सदस्य संजय शिनगारे यांनी स्वीकारले. या आंदोलनात माजी नगराध्यक्ष गणेश माने, नगरसेवक प्रविण कदम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष देवेंद्र देशमुख, नगरसेवक भूषण शिंदे, रमाकांत गलांडे, मराठा पाटील संयोजन समितीचे गजानन ढगे, बाळू पाटील- खडसे, वैभव गायकवाड आदींची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. यावेळी खामगाव शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक संतोष ताले यांच्या मार्गदर्शनात रविंद्र लांडे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.