Maratha Reservation: मराठा युवकांकडून मुंडन करून सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 17:56 IST2018-08-08T17:53:34+5:302018-08-08T17:56:21+5:30
खामगाव : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाज खामगावच्यावतीने छेडण्यात आलेले आंदोलन तीव्र झाले असून, मराठा समाजाच्या शेकडो युवकांनी व समाजबांधवांनी बुधवारी, ८ आॅगस्टरोजी मुंडण करून निषेध नोंदविला.

Maratha Reservation: मराठा युवकांकडून मुंडन करून सरकारचा निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाज खामगावच्यावतीने छेडण्यात आलेले आंदोलन तीव्र झाले असून, मराठा समाजाच्या शेकडो युवकांनी व समाजबांधवांनी बुधवारी, ८ आॅगस्टरोजी मुंडण करून निषेध नोंदविला. यावेळी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद आंदोलन देखील करण्यात आले.
मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरू असून खामगावात सकल मराठा समाजाकडून काल ७ आॅगस्टपासून आंदोलन छेडण्यातआले आहे. या दरम्यान ८ आॅगस्ट रोजी येथील एसडीओ कार्यालयासमोर घंटानाद व मुंडण आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून यावेळी मराठा समाजाच्या तब्बल ३०० तरूणांनी मुंडण करत सरकारचा निषेध केला. सकाळपासूनच आंदोलनस्थळी नागरीकांची प्रचंड गर्दी दिसून आली. या आंदोलनाला अनेक पक्ष, संघटनांनी पाठींबा दर्शविला आहे. (प्रतिनिधी)
उद्याचा खामगाव बंद कायम
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या ९ आॅगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. उद्याचा खामगाव बंद कायम असल्याची माहिती सकल मराठा समाज खामगाव तालुक्याच्यावतीने देण्यात आली आहे. सर्व व्यापारी बांधवांनी आपली प्रतिष्ठाने तसेच सर्व शाळा, कॉलेजेस, खाजगी वाहतूक बंद ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.