शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

Maratha kranti Morcha : खामगावात कडकडीत बंद, दुकाने बंद, शाळा महाविद्यालयांना सुटी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 12:10 IST

खामगाव : सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला खामगाव शहरातील व्यापारी, किरकोळ विक्रेत्यांनी प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली.

ठळक मुद्दे सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातून रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात आले. सकाळी १० वाजता खामगाव येथील बसस्थानक चौकात दुकाने बंद करण्याच्या कारणावरून गोंधळ निर्माण झाला होता. ही रॅली शहरातील प्रमुख मार्गाने फिरून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहचली.

खामगाव : सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला खामगाव शहरातील व्यापारी, किरकोळ विक्रेत्यांनी प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली. तर खबरदारी म्हणून शाळा महाविद्यालयांनाही सुटी देण्यात आली आहे. सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी महाराष्ट बंदची हाक देण्यात आली. समस्त मराठा समाज हा कायमच सर्वांच्या संकटसमयी संरक्षकाच्या भुमीकेत राहिला आहे. यास इतिहास ही साक्ष आहे. त्यामुळेच कोणताही विरोध न करता शहरातील किरकोळ विक्रेते, व्यापाºयांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून पाठींबा दर्शवला. सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातून रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात आले. त्याआवाहनाला खामगावकरांनी प्रतिसाद दिला. सकाळी १० वाजता खामगाव येथील बसस्थानक चौकात दुकाने बंद करण्याच्या कारणावरून गोंधळ निर्माण झाला होता. मात्र पोलिसांच्या सकर्ततने अनर्थ टळला. ही रॅली शहरातील प्रमुख मार्गाने फिरून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहचली. येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. एक मराठा लाख मराठा, काकासाहेब अमर रहे, तुमचे बलिदान व्यर्थ जाणार नाही अशाप्रकारच्या घोषणा दिल्या. यानंतर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी देवेंद्र देशमुख, संजय शिनगारे, प्रविण कदम यांच्यासह शेकडो सकल मराठा बांधव उपस्थित होते. खामगांवात कॉंग्रेसचा जाहिर पाठींबा मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदला खामगांवात  माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी खामगांव मतदार संघातील समस्त कॉंग्रेस जणांच्या वतीने आपला जाहिर पाठींबा दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरीता जलसमाधी घेतलेल्या हुतात्मा कै.काकासाहेब शिंदे यांनी दिलेले बलिदान व्यर्थ जाणार नाही. फडणवीस सरकार हे आरक्षणविरोधी आहे. जो पर्यंत आपण संघटीत होउन या सरकारचा मुकाबला करणार नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही. महाराष्ट बंदमध्ये सर्वांनी सामील होउन शांततेच्या मागार्ने व संयम पाळुन बंद यशस्वी करावा व कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले आहे.

टॅग्स :khamgaonखामगावMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद