मराठा क्रांती मोर्चास जय भगवान महासंघाचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 23:55 IST2017-08-08T23:50:12+5:302017-08-08T23:55:13+5:30

बुलडाणा : ९ ऑगस्ट २0१७ रोजी क्रांती दिनी मंत्रालय मुंबई येथे होऊ घातलेल्या मराठा क्रांती मोर्चा निमित्ताने ६ ऑगस्ट रोजी जय भगवान महासंघ जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते बैठक स्थानिक शासकीय विo्रामगृह, बुलडाणा येथे पार पडली. यावेळी मुंबई येथील मराठा क्रांती मोर्चास जय भगवान महासंघातर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला.

Maratha Kranti Morcha Jaya Bhagwan Mahasangha's support | मराठा क्रांती मोर्चास जय भगवान महासंघाचा पाठिंबा

मराठा क्रांती मोर्चास जय भगवान महासंघाचा पाठिंबा

ठळक मुद्दे बुलडाणा येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली बैठकबैठकीत कोपर्डी येथील घटनेचा जाहीर निषेध करण्यात आलामुंबई येथे आयोजित मराठा क्रांती मोर्चात एकजुटीने सहभागी होण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : ९ ऑगस्ट २0१७ रोजी क्रांती दिनी मंत्रालय मुंबई येथे होऊ घातलेल्या मराठा क्रांती मोर्चा निमित्ताने ६ ऑगस्ट रोजी जय भगवान महासंघ जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते बैठक स्थानिक शासकीय विo्रामगृह, बुलडाणा येथे पार पडली. यावेळी मुंबई येथील मराठा क्रांती मोर्चास जय भगवान महासंघातर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला.
सदर बैठकीस जय भगवान महासंघ जिल्हा संपर्क प्रमुख जिल्हाध्यक्ष विशालराव नागरे, न.पा.उपाध्यक्ष विजय जायभाये, जिल्हा उपाध्यक्ष बाळू पाटील मुंडे, पं.स.माजी सभापती सतिशराव वाघ, सरपंच मुकेशराव वाघ, माजी नगरसेवक अनिलराव वारे, प्रविण थोरात, गणेश धुंदळे तसेच सर्व शाखाप्रमुख, पदाधिारी व कार्यकर्ते हजर होते. बैठकीत कोपर्डी येथील घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी बैठकीस उपस्थित मान्यवरांची समायोचित भाषणे झालीत. 
मुंबई येथे होणार्‍या मराठा क्रांती मोर्चात सर्व समाजातील सर्वांनी एकदिलाने, एकजुटीने व ताकतीने सहभागी होऊन मोर्चा यशस्वीतेसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.

Web Title: Maratha Kranti Morcha Jaya Bhagwan Mahasangha's support