मनोज जरांगे पाटील यांची खामगावात सभा, ४ डिसेंबर रोजी विदर्भ दौरा

By सदानंद सिरसाट | Updated: November 28, 2023 16:31 IST2023-11-28T16:30:47+5:302023-11-28T16:31:48+5:30

दुपारी ४ वाजता खामगाव येथेही त्यांची सभा होणार आहे.

Manoj Jarange Patil s rally in Khamgaon, Vidarbha tour on 4th December | मनोज जरांगे पाटील यांची खामगावात सभा, ४ डिसेंबर रोजी विदर्भ दौरा

मनोज जरांगे पाटील यांची खामगावात सभा, ४ डिसेंबर रोजी विदर्भ दौरा

खामगाव (बुलढाणा) : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठा समाज बांधवांच्या समस्या जाणून घेण्यासोबतच त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे ४ डिसेंबर सोमवारी विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. त्या दिवशी दुपारी ४ वाजता खामगाव येथेही त्यांची सभा होणार आहे.

जरांगे पाटील यांच्या भेटीच्या नियोजनानुसार, सकाळी ११ वाजता जळगाव खा. जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे सभा, त्यानंतर विदर्भातील मलकापूर येथे दुपारी १ वाजता, तर खामगाव शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद मैदानात दुपारी ४ वाजता सभा होणार आहे. त्यानंतर, ते शेगाव येथे श्रींच्या दर्शनासाठी जाणार असून, तेथे मुक्काम करणार आहेत.

शहरातील सभेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक सकल मराठा समाज बांधवांची नियोजन बैठक नुकतीच पार पडली. सभेच्या यशस्वीतेसाठी सकल मराठा समाज बांधवांकडून तयारी सुरू आहे. सभेला समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Web Title: Manoj Jarange Patil s rally in Khamgaon, Vidarbha tour on 4th December