धावत्या बसमध्ये प्रवाशाचा ह्दयविकाराने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 15:22 IST2020-02-04T15:22:16+5:302020-02-04T15:22:23+5:30
जळगाववरून संग्रामपूर मार्गे तेल्हाराकडे जात असताना वरवट बकाल नजीक त्यांच्या छातीत दुखायला लागले.

धावत्या बसमध्ये प्रवाशाचा ह्दयविकाराने मृत्यू
वरवट बकाल: जळगाव जामोद वरून तेल्हाराकडे जाणाऱ्या बसमध्ये वृद्ध प्रवाशाचा ह्दयविकाराने मृत्यू झाल्याची घटना ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता घडली.
अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील मधुकर खिरोडकर (वय ६९) नातवाच्या भेटीला खेर्डा येथे आले होते. संग्रामपूर येथे सोमवारी ते तेल्हारा आगाराच्या एमएच-१४-बीटी-०६४१ या बसने निघाले. जळगाववरून संग्रामपूर मार्गे तेल्हाराकडे जात असताना वरवट बकाल नजीक त्यांच्या छातीत दुखायला लागले. प्रवाशांनी तातडीने चालकाला माहिती देत बस ग्रामिण रुग्णालयाकडे नेण्याची विनंती केली. मात्र उपचारापूर्वीच खिरोडकर यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी ओळखपत्राच्या सहाय्याने नातेवाईकांना माहिती दिली. खिरोडकर यांच्या पश्चात पत्नीसह भाऊ, दोन मुलं, सुना, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे.