वीज चोरी प्रकरणी फरार आरोपीस अकरा महिन्यानंतर अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 12:10 IST2019-12-11T12:10:00+5:302019-12-11T12:10:20+5:30
पोलिसांनी शे. अफसर शे. युनुस विरूध्द भारतीय विद्युत कायदा कलम १३५ नुसार गुन्हा दाखल केला होता.

वीज चोरी प्रकरणी फरार आरोपीस अकरा महिन्यानंतर अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : वीज चोरी प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या फरार आरोपीस शहर पोलिसांनी तब्बल अकरा महिन्यानंतर अटक केली. त्याला सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले
याबाबत महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता संजय शेषराव कुटे यांनी २ जानेवारी २०१९ रोजी नांदुरा येथील शे. अफसर शे. युनुस (३६) याच्या घरावर छापा मारून त्याच्या वीज मिटरची चौकशी केली. त्यावेळी शे. अफसर शे. युनुस याने मिटरमध्ये छेडछाड करून ३८९० रू. ची विद्युत चोरी केल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी त्यांनी येथील शहर पोस्टेला तक्रार दिली होती.
तक्रारीवरून पोलिसांनी शे. अफसर शे. युनुस विरूध्द भारतीय विद्युत कायदा कलम १३५ नुसार गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून तो फरार झाला. दरम्यान शहर पोलिसांना आरोपी शे. अफसर शे. युनूस हा रविवारी नांदुरा येथे घरी आल्याची गुप्त माहिती मिळाली. यावरून शहर पोस्टेचे ठाणेदार सुनिल अंबुलकर, पोकॉ संतोष वाघ, पोकाँ शिवशंकर वायाळ यांनी नांदुरा येथे जावून त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
(प्रतिनिधी)