मलकापुरात वाहतुकीची कोंडी
By Admin | Updated: September 17, 2014 00:55 IST2014-09-17T00:55:21+5:302014-09-17T00:55:21+5:30
मलकापूर येथील मुख्य रस्त्यांच्या कामाच घोंगडं भिजतच.

मलकापुरात वाहतुकीची कोंडी
मलकापूर - रस्त्यासाठीचा निर्धारीत कालावधी संपला असतांना सुमारे तीन वर्षापासून शहरातील मु ख्य रस्त्यात समाविष्ट असलेल्या नांदुरा रोड व स्टेशन रोड या रस्त्यांच्या कामांचं घोंगडं भिजतच आहे. त्यासाठी सा.बा.विभाग व महावितरण कंपनीतील साठमारी कारणीभूत असल्याचे बोलल्या जात आहे. परिणामी रहदारीसाठी प्रचंड अडचणी निर्माण होत असून वाहनधारकासह नागरीकांनाही त्याची झळ बसताना दिसत आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, सुमारे तीन चार वर्षापुर्वी शासनाच्या वतीने शहरातील नांदुरा रोड व स्टेशनरोड या दोन प्रमुख रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला. त्या धरतीवर कामांना सुरुवातही झाली. मात्र सद्या स्थितीत कुठल्याना कुठल्या कारणावरुन रस्त्यांचे कामांना सं थगती येतांना दिसत असून सदर कामांचे घोंगडं भिजत आहे.