शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूर एसडीओ कार्यालयात सर्वपक्षीय नेते व शेतकर्‍यांचा दोन तास ठिय्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 00:38 IST

अकोल्यातील शेतकरी आंदोलनात ४ रोजी माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. त्या कारवाईच्या निषेधार्थ व आंदोलकांच्या सर्मथनार्थ मलकापूर येथील एसडीओ कार्यालयावर सर्वपक्षीय नेत्यांनी व शेतकर्‍यांनी तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्देयशवंत सिन्हा यांना स्थानबद्ध केल्याचा निषेधअकोल्यातील शेतकरी आंदोलनाला मलकापूरवासियांचा पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : अकोल्यातील शेतकरी आंदोलनात ४ रोजी माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. त्या कारवाईच्या निषेधार्थ व आंदोलकांच्या सर्मथनार्थ मलकापूर येथील एसडीओ कार्यालयावर सर्वपक्षीय नेत्यांनी व शेतकर्‍यांनी तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन केले. भाराकाँ जिल्हाध्यक्ष आ.राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात शासनविरोधी घोषणा देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली.याबाबत अधिक माहिती अशी की, शेतकर्‍यांच्या प्रश्नावर माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्यासह शेतकरी जागर मंचचे शेकडो कार्यकर्ते ४ रोजी जाब विचारण्यासाठी निघाले असता, त्यांना अकोल्यात पोलिसांनी स्थानबद्ध केले. त्याच्या निषेधार्थ व आंदोलनकर्त्यांच्या सर्मथनार्थ आ.राहुल बोंद्रे, माजी आ.वसंतराव शिंदे, अँड.साहेबराव मोरे, पक्षनेते डॉ.अरविंद कोलते, पीरिपा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे, प्रहार संघटनेचे संभाजी शिर्के, माजी नगराध्यक्ष श्यामकुमार राठी आदींनी मलकापूर एसडीओ कार्यालयात ठिय्या दिला. शासनाविरुद्ध नारेबाजी करण्यात येऊन अकोल्यातील आंदोलनकर्त्यांवरील कारवाई मागे घ्या, अन्यथा आमच्यावरही कारवाई करा, असा पवित्रा मलकापुरात घेण्यात आला. हा पवित्रा अचानक घेण्यात आल्याने महसूल व पोलीस या दोन्ही प्रशासनांची एकच तारांबळ उडाली. तहसीलदार विजय पाटील यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक अंबादास हिवाळे देखील उपस्थित होते. 

टॅग्स :FarmerशेतकरीagitationआंदोलनYashwant Sinhaयशवंत सिन्हाAkola cityअकोला शहर