मलकापूर : वडोदा शिवारात मुसळधार पाऊस, अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू
By विवेक चांदुरकर | Updated: April 20, 2023 16:09 IST2023-04-20T16:09:33+5:302023-04-20T16:09:47+5:30
घटना १९ एप्रिल रोजी सायंकाळी वडोदा शिवारात घडली.

मलकापूर : वडोदा शिवारात मुसळधार पाऊस, अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू
मलकापूर : कडुलिंबाच्या झाडाखाली उभ्या असलेल्या ५४ वर्षीय इसमाचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना १९ एप्रिल रोजी सायंकाळी वडोदा शिवारात घडली.
बुधवारी सायंकाळी वडोदा शिवारात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा येथील संतोष वाघमारे व त्यांचा मित्र रवींद्र शंकर वाघमारे (वय ५४) हे दोघे वडोदा शिवारात ढगांचा गडगडाट व पाऊस सुरू असताना कडुलिंबाच्या झाडाखाली उभे होते. यादरम्यान वीज पडल्याने रवींद्र वाघमारे यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाल्याची तक्रार संतोष वाघमारे यांनी दिली. मलकापूर ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.