मलकापुरच्या विद्यार्थिनीचा मध्य प्रदेशात आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 11:55 AM2020-01-20T11:55:26+5:302020-01-20T11:55:34+5:30

मलकापूर : येथील शिवाजी नगरातील रहिवासी १६ वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह मध्य प्रदेशातील नेपानगरात रविवारी आढळला.

Malkapur girl student body found in Madhya Pradesh | मलकापुरच्या विद्यार्थिनीचा मध्य प्रदेशात आढळला मृतदेह

मलकापुरच्या विद्यार्थिनीचा मध्य प्रदेशात आढळला मृतदेह

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : येथील शिवाजी नगरातील रहिवासी १६ वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह मध्य प्रदेशातील नेपानगरात रविवारी आढळला.
मृत विद्यार्थिनी ही १३ जानेवारीपासून शाळेत जाताना गायब झाल्याची पोलिसात तक्रार असल्याने मलकापुरात एकच खळबळ उडाली असून, शहरात समाजमन हादरले आहे.
विद्यार्थिनी गायब झाल्यानंतर एका तक्रारीवरून मलकापूर पोलिसांनी भादंविच्या कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल करून शोधपत्रिका जारी केली. त्यावरून मध्य प्रदेश पोलीस मलकापुरात दाखल झाले. १४ जानेवारी रोजी नेपानगर रेल्वे ट्रॅकजवळ मृतदेह आढळल्याचे स्पष्ट झाले. मृत मुलगी मलकापुरची असल्याच समोर आले आहे. रविवारी सकाळी या घटनेची वार्ता मलकापूर शहरात पसरली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. बेपत्ता मुलीचा मृत्यू झाला कसा हा विषय सकाळपासून चर्चेचा आहे. मुलीची हत्या कशी झाली, अपहरण झाले का? असे विविध मुद्दे आजच चर्चेत आहे. यात १६ वर्षीय चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने समाजमन हादरले आहे.
  

विद्यार्थिनीच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी
बेपत्ता विद्यार्थिनीचा मृतदेह आढळल्याची वार्ता धडकताच मलकापूर येथील शिवाजी नगर आणि परिसरातील नागरिकांनी रविवारी रात्री पोलीस स्टेशनवर धडक दिली. आरोपीची चौकशी करावी, त्याला अटक करून शिक्षा करण्याची मागणी यावेळी संतप्त जमावाने लावून धरली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया ढाकणे यांनी नागरिकांशी चर्चा केली.

Web Title: Malkapur girl student body found in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.