शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूर निवडणूक निकाल : भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे राजेश एकडे विजयी; संचेती पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 16:33 IST

Malkapur Vidhan Sabha Election Results 2019: राजेश एकडे यांना ८६२७६ मते मिळाली आहेत, तर संचेती यांना ७१८९२ मते मिळाली.

मनोज पाटीलमलकापूर :- मलकापूर विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीत काँग्रेसचे राजेश एकडे यांनी विजय  संपादन करीत 'आमदारकीचा ' बहुमान पटकविला असून या परिवर्तनामुळे मतदारसंघात निश्चितच काँग्रेस पक्षाला 'अच्छे दिन ' आले आहेत. या विजयाचा जल्लोष काँग्रेसच्या वतीने दिवाळी पूर्वीच फटाके फोडून संपूर्ण मतदारसंघात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राजेश एकडे यांना ८६२७६ मते मिळाली आहेत, तर संचेती यांना ७१८९२ मते मिळाली.         विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर विधानसभा मतदार संघावर अधिक काळ भाजपाचेच वर्चस्व राहिले आहे. त्यामुळेच हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. अशी ख्याती असलेल्या बालेकिल्ल्याला या निवडणुकीत मात्र काँग्रेसने सुरुंग लावीत भाजपाचे उमेदवार चैनसुख संचेती यांच्या विजयी षटकाराला धक्कादायक रित्या रोखले आहे. या निकालाने भाजपात सन्नाटा तर काँग्रेसमध्ये जल्लोषाचे वातावरण पसरले आहे.           गत पंचवीस वर्षापासून मलकापूर विधानसभा मतदार संघावर आमदार चैनसुख संचेती यांच्या रूपाने भाजपाचे वर्चस्व अबाधित राहिले आहे. तब्बल पाच वेळा आमदार होऊन विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष होण्याचा बहुमान आमदार संचेती यांनी पटकाविला आहे. याच यशाच्या धर्तीवर या निवडणुकीतही आमदारकीची माळ भाजपाचे चैनसुख संचेती यांच्याच गळ्यात पडेल असा अंदाज नव्हे तर विश्वासच राजकीय पटलावर नेहमीप्रमाणे वर्तविला जात होता.                             आमदार चैनसुख संचेती यांच्या विजयाकरिता मलकापुर मतदार संघात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची जाहीर सभा घेण्यात आली होती. तसेच अभिनेते गोविंदा यांचा रोड शो सुद्धा संपन्न झाला होता. अशा परिस्थितीत काँग्रेसचे राजेश एकडे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्या व्यतिरिक्त काँग्रेस पक्षाकडून कोणत्याही मोठ्या नेत्याची सभा अथवा रॅली या मतदारसंघात संपन्न झाली नव्हती.               काँग्रेसचे राजेश एकडे यांच्या विजयाने भाजपाची सारी राजकीय समीकरणे फोल ठरली असून या विजयामुळे  चैनसुख संचेती यांच्या ऐवजी राजेश एकडे यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली आहे. पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीत प्रथमच नांदुरा शहराला या निकालाने प्रतिनिधित्व मिळाले आहे.                मलकापुर मतदार संघात विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांना प्राप्त झालेली मते....        भाजपाचे चैनसुख संचेती-७१,८९२ , काँग्रेसचे राजेश एकडे-८६,२७६ , वंचित बहुजन आघाडीचे नितीन नांदुरकर-१२,५४९,अपक्ष बळीराम धांडे-६००, अपक्ष शेख आबीद शेख बशीर-५४१, अपक्ष विजय गव्हाड-९,८७६, बहुजन समाज पार्टी चे प्रमोद तायडे-१०२१, अपक्ष प्रवीण गावंडे-३१०, अपक्ष दत्ता येनकर-२३६, अपक्ष अवकाश कैलास बोरसे-४६४, अपक्ष (एमआयएम समर्थित) अ. मजिद कुरेशी अ.कदीर-६३३ आदी ११ उमेदवार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते.

टॅग्स :malkapur-acमलकापूरChainsukh Sanchetiचैनसुख संचेतीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेस