काँग्रेस नगरसेवकाची पाणीपुरवठा अभियंत्यास सभागृहातच मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 06:16 PM2021-05-25T18:16:48+5:302021-05-25T18:20:13+5:30

Malkapur News : सनाउल्ला जमादार यांनी आचार्य यांना शिवीगाळ करीत त्यांच्या शर्टाची कॉलर धरून ओढाताण केली, तसेच त्यांच्या कानशिलात लगावत मारहाण

Malkapur : Congress corporator beaten water supply engineer | काँग्रेस नगरसेवकाची पाणीपुरवठा अभियंत्यास सभागृहातच मारहाण

काँग्रेस नगरसेवकाची पाणीपुरवठा अभियंत्यास सभागृहातच मारहाण

Next
ठळक मुद्देसालीपुरा प्रभागातील जलवाहिनीचा मुद्दानगरसेवकाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर (बुलडाणा): सालीपुरा प्रभागातील जलवाहिनी प्रस्तावाच्या कारणास्तव काँग्रेसचे नगरसेवक सनाउल्ला जमादार यांनी पाणीपुरवठा अभियंता निनाद आचार्य यांना जाब विचारीत शिवीगाळ करून कानशिलात लगावल्याची घटना मंगळवारी दुपारी नगर परिषद सभागृहात घडली. याप्रकरणी अभियंत्याच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात नगरसेवक सनाउल्ला जमादार यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

नगर परिषदेच्या सभागृहात स्थायी समितीची बैठक संपल्यानंतर पदाधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत सालीपुरा प्रभागातील जलवाहिनी संदर्भात चर्चा सुरू होती. यावेळी नगरसेवक, स्थायी समिती सदस्य सनाउल्ला जमादार यांनी पाणी पुरवठा अभियंता निनाद आचार्य यांना जलवाहिनीचे काम पूर्ण आहे, असा प्रस्ताव पाठविण्याचे सूचित केले. काम पूर्ण झाले नाही, त्यामुळे प्रस्ताव पाठवू शकत नाही, असे उत्तर आचार्य यांनी दिले. त्यावर सनाउल्ला जमादार यांनी आचार्य यांना शिवीगाळ करीत त्यांच्या शर्टाची कॉलर धरून ओढाताण केली. तसेच त्यांच्या कानशिलात लगावत मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी पाणी पुरवठा अभियंता आचार्य यांनी थेट पोलिस स्टेशन गाठून नगरसेवक जमादार यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली. त्यांची वैद्यकीत तपासणी केली असता आचार्य यांच्या कानाच्या आतील भागात इजा झाल्याचे पुढे आले. त्यावरून शहर पोलीस स्टेशनला आरोपी जमादार विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास सपोनि शरद माळी करीत आहे.
चौकट

 कर्मचा ऱ््यांसह पोहचले पोलिस ठाण्यात
सभागृहात स्थायी समितीची सभा संपल्यानंतर पाणी पुरवठा अभियंता निनाद आचार्य हे नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ, उपाध्यक्ष रशीदखा जमादार व सभागृह लिपिक संजय मांडवेकर यांच्याशी चर्चा करीत होते. दरम्यान नगरसेवक सनाउल्ला जमादार यांनी त्यांच्या कानशिलात लगावली. या घटनेने सभागृहात एकच खळबळ उडाली. घडलेल्या घटनेचा निषेध करीत संपूर्ण नगर परिषद कर्मचारी पाणी पुरवठा अभियंता आचार्य यांच्यासोबत शहर पोलीस स्टेशनला दाखल झाले. दरम्यान नगराध्यक्षांसह पाणी पुरवठा सभापती अनिल गांधी या पदाधिकाऱ््यांनी प्रकरण आपसात मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळे हा प्रयत्न अयशस्वी ठरून याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले.

Web Title: Malkapur : Congress corporator beaten water supply engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.