विद्यार्थीनीच्या गूढ मृत्यूप्रकरणी मलकापूर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 12:00 PM2020-01-20T12:00:04+5:302020-01-20T12:02:27+5:30

रविवारी शेकडो पुरुष महीलांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्यानंतर शहर बंद करण्यासाठी  सोमवारी सकाळी असंख्य नागरिक रस्त्यावर उतरले.

Malkapur closed for mysterious death of student | विद्यार्थीनीच्या गूढ मृत्यूप्रकरणी मलकापूर बंद

विद्यार्थीनीच्या गूढ मृत्यूप्रकरणी मलकापूर बंद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर: येथील शिवाजी नगरातील १६ वर्षीय विद्याथीर्नीचा मृतदेह मध्य प्रदेशातील नेपानगरात आढळल्याने दोन दिवसापासून मलकापूरात खळबळ उडाली आहे.  रविवारी शेकडो पुरुष महीलांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्यानंतर शहर बंद करण्यासाठी  सोमवारी सकाळी असंख्य नागरिक रस्त्यावर उतरले. घटनेची तात्काळ चौकशी व्हावी अशा प्रमुख मागणीस पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी उत्तर दिल्यानंतर आंदोलक माघारी परतले.
शहरातील शिवाजी नगर भागातील एक १३ वर्षीय विद्यार्थीनी शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडली.ती परत आलीच नाही. तिचा मृतदेह मध्य प्रदेशातील नेपानगरातील रेल्वे स्थानकाजवळ आढळून आला. त्यामुळे मलकापूरात एकच खळबळ उडाली. रविवारी  सदर मुलीचा मृतदेह परीवारातील सदस्यांसह नागरिकांनी ताब्यात घेतला. हा मृत्यू संशयास्पद असल्याने या प्रकरणाची तात्काळ चौकशी व्हावी व कारवाई व्हावी या मागणीवरून शिवाजी नगर व शहरातील शेकडो पुरुष व महीलांनी त्या मुलीच्या मृतदेहासह पोलिस ठाण्यावर धडक मोर्चा काढला. पोलिस उपविभागीय अधिकारी प्रिया ढाकणे यांनी चौकशी व कारवाईसाठी आश्वस्त केल्याने रविवारी उशिरा रात्री मोर्चेकरी शांत झाले. त्यानंतर सोमवारी त्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी शिवाजी नगरातील असंख्य नागरिक रस्त्यावर उतरले. तात्काळ चौकशी व कारवाईची मागणी करण्यात येवून मलकापूर बाजार पेठ बंदचे आवाहन आंदोलकांनी केले.
दरम्यान पोलिस निरीक्षक कैलास नागरे आंदोलकांच्या भावना समजून घेतल्या पोलीस प्रशासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. असे त्यांनी सांगितल्याने आंदोलकांनी माघार घेतली. दरम्यान सकाळपासूनच मलकापूर बाजारपेठ बंद होती.
 

Web Title: Malkapur closed for mysterious death of student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.