शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवस साजरी होणार मकरसंक्रांत; १७ वर्षांनंतर जुळून आला योग! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 00:30 IST

​​​​​​​लोणार : मकरसंक्रांत १४ जानेवारी रोजी सगळीकडे साजरी केली जाते; मात्र यावेळची  मकरसंक्रांत विशेष असून, १७  वर्षांनंतर  पौष रविवारी संक्रांत असा योग जुळून आला  आहे. याआधी २00१  मध्ये हा योग आला होता. तसेच यावर्षी दोन दिवस मकरसंक्रांत  साजरी केली जाणार आहे. 

ठळक मुद्देआज मकरसंक्रांत

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : मकरसंक्रांत १४ जानेवारी रोजी सगळीकडे साजरी केली जाते; मात्र यावेळची  मकरसंक्रांत विशेष असून, १७  वर्षांनंतर  पौष रविवारी संक्रांत असा योग जुळून आला  आहे. याआधी २00१  मध्ये हा योग आला होता. तसेच यावर्षी दोन दिवस मकरसंक्रांत  साजरी केली जाणार आहे. १४ जानेवारी रोजी दुपारी १  वाजून ४७  मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल, त्यानं तर १५  जानेवारी रोजी सकाळी  ५  वाजून ११  मिनिटांपर्यंत संक्रांत असेल. रविवारचा  कारक ग्रह सूर्य असून, हा सणही सूर्यदेवाचा आहे. त्यामुळे २0१८  च्या मकरसंक्रांतीचे  महत्त्व अधिकच वाढले आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य दक्षिण दिशेहून उत्तर दिशेत  जातो, त्यानंतर खरमास सप्ताह असतो. राज्यात मकरसंक्रांत सण तीन दिवस साजरा  करतात. यास भोगी १३ जानेवारी,  संक्रांती १४  जानेवारी  व किंक्रांती १५  जानेवारी  अशी नावे आहेत. संक्रांत म्हणजे संक्रमण, मार्ग क्रमून जाणे किंवा ओलांडून जाणे.  सूर्याचे एका राशीतून दुसर्‍या राशीत संक्रमण अर्थात मार्गक्रमण होत असते. सूर्य जेव्हा  मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा जी संक्रांत येते ती मकर संक्रांत. यावेळी सूर्याचे  दक्षिणायण संपून उत्तरायण सुरू होते. दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो. संक्रांतीचा  आदला दिवस हा भोगी म्हणून साजरा करतात. या दिवशी तीळमि२िँं१्रूँं१त पाण्याने स्नान  करायचे. तिळाची भाकरी, वांग्याचे भरीत, मिश्र भाजी करण्याची प्रथा आहे. संक्रांतीचा  आणखी एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे ज्याप्रमाणे आपण दसर्‍याला मोठय़ा लोकांना  आपट्याची पाने देऊन त्यांचे आशीर्वाद घेतो, त्याचप्रमाणे संक्रांतीलाही तीळगूळ वाटून  नात्यांमधील गोडवा आणखी वाढावा, यासाठी ‘तीळगूळ घ्या, अन् गोड-गोड बोला’,  असा संदेश दिला जातो. आपली जुनी भांडणे विसरून पुन्हा स्नेहाचे, सलोख्याचे संबंध  निर्माण करण्यासाठी ही मोठी संधीच असते. ज्यांचे संबंध चांगलेच आहेत, त्यांचे संबंध  अधिक दृढ होण्यासाठी याचा उपयोग होतो. मकरसंक्रांतीच्या दिवशी स्नान, दान, जप, त पाला विशेष महत्त्व आहे.  मकरसंक्रांतीच्या दिवशी तूप, तीळ, खिचडी या दानाला खास महत्त्व आहे. प्रत्येक  राशीनुसार दान असल्याचे बोलले जाते. संक्रांतीच्या दिवशी काळय़ा वस्त्रांना महत्त्व दिले  जाते. कारण काळी वस्त्रे उष्णता शोषून घेतात. म्हणून काळ्या साड्या, काळी झबली,  अशी वस्त्रे संक्रांतीच्या सुमारास कापड बाजारात विक्रीसाठी दिसू लागतात. (प्रतिनिधी)

पतंगोत्सवाची परंपरा - मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याचीही प्रथा आहे. यामागे एक विशिष्ट अर्थ आहे.  सामान्यपणे पतंग उडवण्यासाठी घराच्या छतावर किंवा मैदानात जावे लागते. यामुळे  सहजच आपण कोवळ्या उन्हाचाही आनंद मिळतो. संक्रांतीच्या दिवशी ज्या प्रकारे  आकाशात लाल, पिवळ्या, निळ्या रंगांचे पतंग उडताना दिसतात.- संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत कोणत्याही दिवशी लहान मुलांचे ‘बोर न्हाण’ केले जाते.  यावेळी लहान मुलांना भोवताली बसवून मध्ये पाटावर बाळाला बसवतात. 

टॅग्स :Makar Sankranti 2018मकर संक्रांती २०१८