शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

मजीप्रा उठली खामगाव पालिकेच्या मुळावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 01:18 IST

खामगाव: शहरातील पाणी पुरवठय़ाची घडी बसवताना महाराष्ट्र जीवन  प्राधिकरणकडून वारंवार पालिकेला कोंडीत पकडण्यात येत आहे. परिणामी,  शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करताना पालिकेची चांगलीच दमछाक होत आहे.

ठळक मुद्देमजीप्राचे आडमुठे धोरण पालिकेला दीड कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड

अनिल गवई। लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव: शहरातील पाणी पुरवठय़ाची घडी बसवताना महाराष्ट्र जीवन  प्राधिकरणकडून वारंवार पालिकेला कोंडीत पकडण्यात येत आहे. परिणामी,  शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करताना पालिकेची चांगलीच दमछाक होत आहे.  २0१३ पासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा योजनेचा ताबा सोडत  नसल्याने, पालिकेला प्रति महिना दीड कोटी रुपयांचा भुर्दंड बसत आहे.एक लाख लोकसंख्या असलेल्या खामगाव शहराला पालिका पाणीपुरवठा करते.  त्यासाठी शहरापासून सुमारे २२ किलोमीटरपर्यंत  पाइपलाइन आहे. यामध्ये गेरू  माटरगाव ते जळका भंडग येथील जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत  पाणी  पोहोचविण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे असून, शुद्धीकरण  झालेले पाणी दोन टाक्यांमध्ये आणून वितरणाची जबाबदारी पालिकेची आहे. यात  मात्र उभय संस्थांमध्ये समन्वय नसल्याचे दिसते. त्यामुळे येथील पाणीपुरवठा विस्कळीत होतो. शहराच्या पाणीपुरवठय़ाची  जबाबदारी पालिकेकडे देण्यासाठी मजीप्राकडे वारंवार पत्रव्यवहार झाला; पण  मजीप्राकडून थकीत रकमेसाठी पालिकेला वेठीस धरल्या जात असून, योजनेचा  ताबा देण्यासही नकार दिल्याची धक्कादायक माहिती आहे. देखभाल दुरुस्तीचा  खर्च पालिकेलाच करावा लागतो.

असा आहे खर्च!मजीप्रा, वीज वितरण, पाटबंधारे विभाग, दूरसंचार आणि पालिका यांच्यावर  पुरवठय़ाची दामोदार आहे. यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला धरणापासून  जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पुरवठय़ासाठी सुमारे २ कोटी रुपये, वीज वितरण  कंपनीला वीज बिलापोटी ५0 लाख रुपये, टेलिफोन बिल, पाटबंधारे विभागाचा  खर्च आणि वितरणाचा खर्च मिळून पालिकेला सुमारे ३ कोटी रुपयांचा खर्च येतो.

२६ कोटींची कोंडीमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पालिकेकडे २६ कोटी रुपयांची थकबाकी आहे.  यामध्ये १२ कोटी रुपयांच्या मूळ रकमेचा समावेश असून, १४ कोटी रुपयांच्या  व्याजाचा समावेश आहे. थकीत रक्कमेचा आधी भरणा करा, नंतरच योजनेचा  ताबा घ्या, अशी भूमिका महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून घेतल्या जात आहे.  त्यामुळे पालिका प्रशासनावरील आर्थिक बोजा वाढत असल्याचे दिसून येते.

सततचा तोटा ठरणार घातक!महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून पाणी विकत घेतल्यानंतर पुरवठय़ावरही खर्च  करावा लागत असल्याने योजनेवर दुपटीने खर्च करावा लागतो. त्यामुळे खामगाव  नगर पालिका प्रशासन पाणीपुरवठय़ाबाबत तोट्यात असल्याचे दिसून येते. सततच्या  तोट्यामुळे पाणी पुरवठा योजना आवाक्याबाहेर जाण्याची भीतीही तज्ज्ञांकडून  व्यक्त केली जात आहे.

खासगीकरणातून पालिकेची होणार बचत!पाणी पुरवठय़ाची घडी बसविण्यासाठी तसेच रकमेच्या बचतीसाठी पाणी पुरवठा  योजनेचे खासगीकरण करण प्रस्तावित आहे. यामध्ये धरणापासून ते शहरात वि तरणापर्यंतच्या पाणीपुरवठय़ाची संपूर्ण जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची राहणार  आहे; मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून योजनेचा ताबा दिल्या जात नसल्याने  पालिकेचे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. दरम्यान, या योजनेचे  खासगीकरण केल्यानंतर कंत्राटदाराचे बिल थकल्यास पाणी पुरवठा योजना ठप्प  होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पालिकेचे सवरेतोपरी प्रयत्न केले जात  आहेत. सर्व समस्यांवर लवकरच तोडगा काढण्यासाठी पालिका प्रयत्नरत आहे.- सतीशआप्पा दुडे, पाणी पुरवठा सभापती, नगर परिषद, खामगाव. 

टॅग्स :water transportजलवाहतूक