शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
5
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
6
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
7
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
8
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
11
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
12
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

Maharashtra Assembly Election 2019 : डॉक्टर, प्राध्यापक, वकिलांमध्ये लागली ‘रेस’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 2:51 PM

आता कोणत्या डॉक्टरचे इंजेक्शन ‘पॉवरफुल’ ठरते हे पाहणे रंजक ठरणार आहे. 

ब्रम्हानंद जाधवलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  जिल्ह्यातील सातही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पाहता सध्या डॉक्टर, प्राध्यापक वकिलांमध्ये रेस सुरू असल्याचे दिसून येते. यामध्ये सिंदखेड राजा व जळगाव जामोद या मतदारसंघात तर थेट लढतच ‘डॉक्टर-डॉक्टर’ अशी होत आहे. मेहकर, मलकापूर व खामगावातही डॉक्टर, प्राध्यापक व वकिल निवडणूक रिंगणात आहेत.  त्यामुळे आता कोणत्या डॉक्टरचे इंजेक्शन ‘पॉवरफुल’ ठरते हे पाहणे रंजक ठरणार आहे. निवडणुकीमध्ये उतरणाºया उमेदवारांमध्ये शिक्षणाचा अभाव ही मोठी समस्या असते. परंतू बुलडाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात बहुतांश उमेदवार हे उच्च शिक्षित दिसून येत आहेत. अगदी बोटावर मोजण्या इतक्याच उमेदवारांचे शिक्षण दहावी ते बारावीपर्यंतचे झालेले आहे. मतदारराजाही आता सुज्ञ झाल्यामुळे उमेदवारांच्या शिक्षणाला महत्त्व देत आहे. 

बुलडाणा मतदारसंघबुलडाणा मतदारसंघातील हर्षवर्धन सपकाळ हे बी.कॉम, बी. पी. एड् आहेत. तर विजयराज शिंदे बी. कॉम., योगेंद्र गोडे बी.एस.सी आहेत. तर संजय गायकवाड नववी झाले आहेत.चिखली मतदारसंघचिखली विधानसभा मतदारसंघामध्ये राहुल बोंद्रे (बी. ई. सीव्हील) व श्वेता महाले (डी. फार्मसी) यांच्यात लढत होत आहे. इंजीनीअर आणि फार्मासीस्टची ही टक्कर सध्या मजेदार सुरू आहे.

मेहकर मतदारसंघमेहकर मतदारसंघामध्ये डॉक्टर, वकिल व प्राध्यापक रिंंगणात आहेत. शिवसेनेचे डॉक्टर रायमुलकर, काँग्रेसचे वानखेडे वकिल व वंचित बहुजन आघाडीचे वाघ हे प्राध्यापक आहेत.

सिंदखेड राजा मतदारसंघसिंदखेड राजामध्ये थेट लढत ‘डॉक्टर-डॉक्टर’ यांच्यामध्येच आहे. राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे व शिवसेनेचे डॉ. शशिकांत खेडेकर हे आहेत. कोणत्या डॉक्टरचा इलाज काम कराणार याची उत्सुकता सर्वांना आहे.

जळगाव जामोद मतदारसंघजळगाव जामोदमधील सामना दोन डॉक्टरांमध्येच रंगतदार ठरत आहे. त्यामध्ये भाजपचे डॉ. संजय कुटे व काँग्रेसच्या डॉ. स्वाती वाकेकर यांचा समावेश आहे. इतर उमेदवारांचे शिक्षण बऱ्यापैकी आहे.मलकापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नितीन नांदुरकर हे एमबीबीएस डॉक्टर आहेत. भाजपचे चैनसुख संचेती बीएससी व काँग्रेसचे राजेश एकडे हे बारावी झालेले आहेत.

खामगाव मतदारसंघखामगावमध्ये आकाश फुंडकर यांची वकिली आता कितपत काम करते हे महत्त्वाचे ठरत आहे. काँग्रेसचे ज्ञानेश्वर गणेश हे पाचवी, वंचित बहुजन आघाडीचे वसतकर बी. कॉम आहेत.

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019