Maharashtra Assembly Election 2019 : निवडणूक प्रचारासाठी उरले फक्त चार दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 04:05 PM2019-10-16T16:05:13+5:302019-10-16T16:05:23+5:30

निर्णायक क्षणाच्या दृष्टीने बड्या नेत्यांच्या सभांसाठी मैदान आरक्षीत करण्याची स्पर्धाच जनू सुरू झाली आहे.

Maharashtra Assembly Election 2019: Only four days left to campaign | Maharashtra Assembly Election 2019 : निवडणूक प्रचारासाठी उरले फक्त चार दिवस

Maharashtra Assembly Election 2019 : निवडणूक प्रचारासाठी उरले फक्त चार दिवस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: विधानसभा निवडणुकीचा जाहीर प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू झाला असून निवडणूक रिंगणातील उमेदवारांनी प्रचाराचा वेग व त्यातील सातत्य वाढविले आहे. सोबतच सामाजिक समिकरणे जुळविण्यासाठी गोपनीय बैठकांवर एकीकडे भर दिल्या जात असतानाच शेवटच्या टप्प्यातील सभा आणि अंतिम रॅलीच्या नियोजनावर मध्यरात्रीला बैठकांमध्ये मंथन करण्यात येत आहे. दरम्यान, निर्णायक क्षणाच्या दृष्टीने बड्या नेत्यांच्या सभांसाठी मैदान आरक्षीत करण्याची स्पर्धाच जनू सुरू झाली आहे.
परिणामी आॅक्टोबर हीटचा प्रभाव एकीकडे जाणवत असतााच धडाक्यात सुरू झालेल्या प्रचारामुळे राजकीय वातावरणही तापले आहे. १४ आॅक्टोबर पर्यंत जिल्ह्यात प्रचार कार्यालय, वाहन परवान्यासह रॅली, ध्वनीक्षेपक, होर्डींग परवानग्या, सभा मेळाव्याच्या जिल्ह्यात तब्बल दोन हजार ६८५ परवानग्या घेण्यात आल्या आहेत. परिणामी शेवटच्या टप्प्यात उमेदवारांना वेगवान व आक्रमक प्रचाराचा ज्वर चढल्याचे चित्र आहे. दरम्यान, एकट्या बुलडाणा विधानसभा मतदारसंघात ४३ लाख ७१ हजार ८७९ रुपयांचा खर्च निवडणूक रिंगणातील सात पैकी सहा उमेदवारांनी केला आहे. एका उमेदवाराला २८ लाखापर्यंत खर्च करण्याची मर्यादा निवडणूक आयोगाने घालून दिली आहे.
दरम्यान आठ आॅक्टोबर पासून जिल्ह्यात निवडणुकीच्या प्रचारास प्रारंभ झाला होता. या कालावधीत युतीकडून केंद्रीय गृहमंत्री यांची चिखलीत जंगी सभा घेण्यात आली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नांदुरा, वरवट बकाल आणि खामगावात सभा झाल्याने भाजपच्या गोटात ‘फिल गुड’चे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे आघाडीकडून काँग्रेसचे महासिचव मुकूल वासनिक यांच्या मेहकर, चिखली, जळगाव जामोदसह अन्य ठिकाणी सभा झाल्या. दरम्यान, येत्या काळात बुलडाण्यात काँग्रेसचे महासचिव मुकूल वासनिक, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभा होणार आहे. अंतिम टप्प्यात निवणूक प्रचारात या सभांचा तडका मिळणार असल्याने जिल्ह्यातील दुरंगी, तिरंगी व चौरंगी लढीची रंगत वाढणार आहे.
 
प्रचारासाठी धावताहेत ५३६ वाहने
निवडणूक रिंगणातील ५९ उमेदवारांच्या प्रचारासाठी जिल्ह्यात तब्बल ५३६ वाहने धावत आहेत. भाजप शिवसेनेचे एकूण प्रचार रथ १५७, आघाडीचे १४८, वंचित बहुजन आघाडीचे १३१ आणि इतर उमेदवारांचे १०० प्रचार रथाद्वारे प्रचार केल्या जात आहेत. यामध्ये अधुनिक अशा डिजीटल स्क्रीनचा वापर करून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न केले जात आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अशी प्रचार वाहने उमेदवारांनी आता बाहेर काढली आहे. दरम्यान ध्वनीक्षेपकासह होर्डींगच्या उमेदवारांनी तब्बल एक हजार ९३८ परवानग्या घेतल्या आहेत.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Only four days left to campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.