खामगावात भव्य शोभायात्रा
By Admin | Updated: August 18, 2014 23:43 IST2014-08-18T23:10:58+5:302014-08-18T23:43:56+5:30
विश्व हिंदू परिषदेच्या ५0 व्या स्थापना दिनानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

खामगावात भव्य शोभायात्रा
खामगाव : विश्व हिंदू परिषदेच्या ५0 व्या स्थापना दिनानिमित्त आज १८ ऑगस्ट रोजी खामगाव शहरातून विहींप व बजरंग दलाच्यावतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. सदर शोभायात्रा मुक्तेश्वर आश्रम येथून दुपारी १२ वाजता सुरू झाली.
यानंतर ही शोभायात्रा एकबोटे चौक, अग्रसेन चौक, शहर पो.स्टे., डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बसस्थानक, लोकमान्य टिळक चौक, सरकी लाईन, मेन रोड, महावीर चौक, फरशी या शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली. या शोभायात्रेत अग्रभागी घोड्यावर कार्यकर्ते डोक्यावर मंगल कलश घेवून महाराष्ट्रीय वेशभूषेत फेटा बांधून सहभागी झालेल्या महिला दुर्गा शक्ती तसेच विहिंप च्या कार्यकर्त्या, वारकरी, हातात भगवे ध्वज घेवून शिस्तीत चालणारे बजरंगी आणि रथामध्ये विराजमान श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या आकर्षक मुर्ती लक्ष वेधून घेत होत्या. शोभायात्रेत हभप दायमा महाराज, जिल्हा संघ चालक महादेवराव भोजने, तालुका संघचालक विजयकुमार चौबीसा, जिल्हा मंत्री बापू खराटे, बापुसाहेब करंदीकर, हभप मुरलीधर महाराज करांगळे, देवेंद्र महाराज मार्के, सुपेकर महाराज, गोपाळ महाराज राऊत, पांडुरंग महाराज टिकार, हभप विठ्ठल भोजने, दयाराम महाराज, अँड.अमोल अंधारे, राजेंद्र राजपूत आदी सहभागी झाले होते. सदर शोभायात्रेचा समारोप श्री मुक्तेश्वर आश्रम येथे करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विहिंपच्या विदर्भातील वनवासी आश्रम शाळा, अनाथांचे संगोपन केंद्र, गोरक्षण संस्था, एकल विद्यालय, दवाखाना, रुग्णवाहिका, रक्तदान शिबिर, हिंदू हेल्पलाईन आदी सेवा प्रकल्पांबाबत उपस्थितांना माहिती दिली.