रोहिंग्या मुस्लिमांवरील अत्याचार थांबविण्यासाठी लोणारमध्ये मूक मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 18:39 IST2017-09-15T18:38:56+5:302017-09-15T18:39:12+5:30

म्यानमार देशातील  ब्रम्हा याठिकाणी रोहिंग्या मुस्लीम नागरिकांवर  होणारे अन्याय थांबवावेत या मागणीसाठी शहर व तालुक्यातील हजारो मुस्लीम बांधवांनी तहसिल कार्यालयावर १५ सप्टेंबर रोजी मूक मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन तहसिलदार सुरेश कव्हळे यांना देण्यात आले.

Luni's silent moratorium to stop the atrocities against Rohingya Muslims | रोहिंग्या मुस्लिमांवरील अत्याचार थांबविण्यासाठी लोणारमध्ये मूक मोर्चा

रोहिंग्या मुस्लिमांवरील अत्याचार थांबविण्यासाठी लोणारमध्ये मूक मोर्चा

- किशोर मापारी 

लोणार, दि. 15 -  म्यानमार देशातील  ब्रम्हा याठिकाणी रोहिंग्या मुस्लीम नागरिकांवर  होणारे अन्याय थांबवावेत या मागणीसाठी शहर व तालुक्यातील हजारो मुस्लीम बांधवांनी तहसिल कार्यालयावर १५ सप्टेंबर रोजी मूक मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन तहसिलदार सुरेश कव्हळे यांना देण्यात आले.

शहरातील जामा मजीद चौकापासून पासून दुपारी २ वाजून ३० मिनिटानी मूक मोर्चाला सुरुवात झाली़ . मूक मोर्चा मध्ये सहभागी नागरिकांच्या हातात 'रोहिंग्या मुसलमान पर अत्याचार बंद करो “  या आशयाचे फलक लक्ष वेधून घेत होते. सकाळी अकरा वाजेपासून शहर व तालुक्यातील मुस्लीम समाजबांधव जामा मजीद भागात जमायला सुरुवात झाली होती . सर्व मुस्लीम बांधवांनी कुठलेही घोषणाबाजी न करता तसेच वाहतुकीला अडथळा न येऊ देता शांतेत मूक मोर्चा काढला .या शांततामय मूक मोर्चामुळे एक नवीन आदर्श निर्माण झाला आहे .   

शिस्तीचे दर्शन...
जामा मजीद पासून सुरू झालेल्या मोर्चात शिस्तीचे दर्शन घडले़ . जामा मजीद चौक ते थेट मा.बसवेश्वर चौकापर्यंत मोर्चेकऱ्यांची रांग लागली होती़. मोर्चेकरी अतिशय शिस्तबद्धरित्या तहसिल कार्यालयापर्यंत पोहोचले तर रस्ता ओलांडणाऱ्या महिलांसह नागरिकांना जागो-जागी जागाही करून देण्यात येत होती.

२ हजारांवर बांधव...
मूक मोर्चात सुमारे २ हजारांवर मुस्लीम बांधव सहभागी झाले होते़. कॉंग्रेस नेते बादशहा खान , नगर परिषद आरोग्य सभापती शेख समद, तालुका उपाध्यक्ष अन्नू सर , रौनक अली, हाजी महेमूद सेठ, हाजी नसीम सर , हाजी रिजवान ,एजाज खान , लुकमान कुरेशी , इम्रान खान,अशोक वारे ,अतिक कुरेशी , हाशम कुरेशी यांचे सह हजारो मुस्लीम बांधव शांतेत मूक मोर्चात सहभागी झाले .

Web Title: Luni's silent moratorium to stop the atrocities against Rohingya Muslims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.